मु.का‌.अ.जि.प.ना.व प्र.सं.जि.ग्रा.वि.यं.यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील 2 हजार ९७६ लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण – गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील मु.का.अ.जि.प.ना.व प्र.सं.जि.ग्रा.वि.यं.यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान घरकुल योजनेअतंर्गत धर्माबाद पंचायत समितीला 2 हजार 976 घरकुलांसाठी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यानुषंगाने गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान घरकुल आवास योजना टप्पा ०२ मधील प्रतिक्षा यादीतील 2 हजार 976 पात्र घरकुल लाभाथ्यांची ऑनलाईन नोंदणी पं.स.कार्यालयाने पूर्ण केली आहे. नोंदणीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड व पंचायत समिती सहाय्यक ग.वि.अ.गटुवार , तसेच शाखा अभियंता आर.जी.हाके,बांधकाम क.सा.बि.जी.जाधव यांनी दिली.ऑनलाईन नोंदणी झालेल्या पात्र घरकुल लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार आहे. 

येत्या आठवडाभरात हे उद्दिष्ट निश्चित होणार असल्याचे संबंधित विभागाकडून समजते. ऑनलाईन नोंदणीसाठी लाभार्थ्यांचे आधार कार्ड,बँक खाते,जॉब कार्ड,नमुना नंबर ८ व ग्रामपंचायतीच्या मान्यतेसह इतर आवश्यक माहितीची नोंद करण्यात आली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री घरकुल योजना टप्पा ०२ च्या प्रतिक्षा यादीतील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड , सहाय्यक गटविकास अधिकारी गटूवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

 नोंदणी प्रक्रिया जवळपास आठवडाभर चालली.घरकुल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पं.स. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,सर्व ग्रामपंचायत अधिकारी,घरकुलचे ग्रामीण अभियंते,आरएचई,

घरकुल विभागाचे ऑपरेटर, सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक यांनी काम पाहिले आहे.एकूण 2 हजार 976 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

याकामी गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री गटुवार,तसेच क.प्र,अ.देशपांडे,विस्तार अधिकारी चिद्रावार,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष,सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष गादेवार, सचिव,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सुरेश मुरुडावर , पियुष गायकवाड,व्यंकटेश गायकवाड,घरकुल विभागाचे ऑपरेटर तुलशिदास शिंदे, चव्हाण,आरएचई बाभळीकर , सह सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच,ग्रा.पं.आपरेटर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक, कार्यालयीन अधिकारी,सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
error: Content is protected !!