विशेष प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव
नांदेड : शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे तसेच सामाजिक कार्यात ही सदैव तत्पर आसणारे कैलासरावजी आक्कमवाड यांनी मौजे काकांडी तेथील जिल्हा परिषद शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले आहे. कैलास आक्कमवाड हे कृषी क्षेत्राशी निगडीत आसणारी रामसाईडस क्राँप सायन्स कंपनी मध्ये ते वरिष्ठ अधिकारी असून, रामसाईडस क्राँप सायन्स कंपनीला 50वर्षे पुर्ण झाले आसल्याने कंपनी ने संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. रामसाईडस क्राँप सायन्स कंपनी मार्फत संपूर्ण जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी कैलास आक्कमवाड यांनी लोकतंत्र न्युज लाईव्ह बोलतांना सांगितले आहे. रामसाईडस क्राँप सायन्स कंपनीने 50वर्षाच्या कालखंडात शेतकऱ्यांच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ दिला नाही.त्यामुळेच आज कंपनी डौलात उभी आहे.आणी भविष्यात ही शेतकऱ्यांच्या कसा जास्तीत जास्त फायदा करता येईल यावरच लक्ष केंद्रित केले जाईल आसेही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कैलास आक्कमवाड यांनी सांगितले आहे.स्पर्धा परीक्षा व बक्षीस वितरण करतांना कंपनी चे वरिष्ठ अधिकारी कैलास आक्कमवाड,काकांडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मणियार सर, सरपंच, उपसरपंच व शाळेचा संपूर्ण स्टाँप आणि गावकरी उपस्थित होते.
कैलास आक्कमवाड यांनी घेतला वेगवेगळ्या स्पर्धेचा कार्यक्रम!