माहूर ता.प्रतिनिधी/ पंडित धुप्पे
माहूर – तालुक्यातील वानोळा येथे विविध कार्यालयात 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुनीता सिडाम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पोतूलवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर शिवाजी आत्राम, सार्वजनिक साईनाथ वाचनालयाचे वसंत राठोड, आदिवासी विविध कार्यकारी संस्थाचे चेअरमन माधव शेळके, सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन शंकर आडे, पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर कांबळे, वसंतराव नाईक विद्यालयाचे अध्यक्ष कृष्ण कुमार राठोड, यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी भाषण, पी. टी. लेझीम, डान्स, तर गावातील महिलांनी संगीत खुर्ची,हळदीकुंकू, यासारखे विविध कार्यक्रम सादर केले. यावेळी सरपंच सुनीता सिडाम, उपसरपंच अभिजीत राठोड, माजी चेअरमन संतराम राठोड, गोविंद चव्हाण, माजी प्राचार्य जाधव, माने, शाळेचे मुख्याध्यापक पोतुलवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक माने, केंद्रप्रमुख राजकुमार राठोड, राजेंद्र चारोडे, केंद्रे, बी डी राठोड, अरगुलवार, पत्रकार पंडित धुप्पे, सुदाम चव्हाण, राजेश राठोड, शिवाजी राठोड, सर्व ग्रामपंचायत सदस्य शालेय समितीचे सदस्य हे उपस्थित होते यावेळी “हे गुरुदेव प्रणाम आपके चरणो मे ” हे गीत जिल्हा परिषद च्या विद्यार्थ्यांनी सादर केल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित प्रेषकाना डोळ्यात अश्रू अनावर झाले. या गाण्यासाठी शाळेचे नितीन जाधव, अक्षय राठोड, राहुल पवार, निर्भय चव्हाण, हर्षल राठोड, सुमित चव्हाण, गोपाल राठोड, शिवम राठोड, रितेश जाधव, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र चारोडे ,अरगुलवार, के एस राठोड, व्ही.टी.राठोड,यांनी केले यावेळी गावातील महिला पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.