माहूर तालुका प्रतिनिधी/ पंडित धुप्पे
माहूर – वानोळा गावात व परिसरात अवैध दारू, मटका जुगार, असे अनेक अवैध धंदे चर्चेचा विषय बनला असून यावर अंकुश लावण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे.
यामुळे गावात भांडण तंटे निर्माण होत आहे. अनेक युवा व्यसनाच्या आहारी जात आहेत.अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे, याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन ग्राम जन विकास विकास युवा ग्रुप च्या सदस्यांनी केली आहे. यावेळी दारू बंदी, रोजगार हमी योजना, मटका,जुगार, पाणीपुरवठा, आरोग्य या विषयावर आधारित चर्चा झाली.
यावेळी ग्रामपंचायत चे सर्व अधिकारी, सरपंच सुनिता सिडाम,उपसरपंच अभिजीत राठोड, ग्रामपंचायत सदस्य ,ग्राम जन विकास युवा ग्रुप चे सर्व सदस्य , महिला मंडळ, व समस्त मान्यवर उपस्थित होते.