परभणी जिल्हा पोलिसावाचून राम भरोसे..?
जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
परभणी -शहरातील अपना कॉर्नर येथील सवेरा हॉटेलच्या बाजूला असलेल्या राजाराणी मंगल कार्यालयाजवळ सकाळी 11 वाजता शाहू नगर येथील बौद्ध युवक संतोष तुकाराम पाईकराव वय वर्ष 21 ऑटोचालक यास आडवुन 4 ते 5 जणांनी चाकु भोसकून खून केला.
तरी सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी धाव घेऊन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोस्टमार्टेम होऊ देणार नाही अशी मागणी लावून धरल्याने वरील पैकी 2-3 आरोपींना अटक करण्यात आली त्यानंतर पोस्टमार्टेम करू देण्यात आले…. तसेच नानालपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी मा.पोलीस अधीक्षक यांना देखील कार्यकर्त्यांनी जाब विचारत परभणी जिल्हा राम भरोसे सोडण्यात आले आहे काय असा प्रश्न उपस्थित केला याप्रसंगी भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख सतीश भिसे, वंचित चे शहराध्यक्ष प्रमोद कुटे,भालेराव,तुषार कांबळे, सचिन खरात,राहुल डुमने, संजय वाव्हळे,राजू खरात सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.