सामाजिक क्षेत्रात सदैव मदतीचा हात देणारे कै. पुंडलिक महाराज यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील..
प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर – बाबा महाराज सातारकर यांचे शिष्य व चोपदार कै.ह.भ.प.पुंडलिक महाराज काईतवाड यांचं वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांची बुधवारी सायंकाळी 5 :00 वाजता बोरगडी येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
कै.पुंडलिक महाराज काईतवाड यांनी जनतेच्या सेवेमध्ये राहून काम करत असताना नियतीने कोहिनूर हिऱ्याला हिरावून नेलं असून त्यामुळे सबंध हिमायतनगर तालुक्यांमध्ये शोकाकुल वातावरण असल्याचे दिसून आले आहे.
आणि त्यांची अंत्यविधी दिनांक 6/02/ 2025 रोजी बोरगडी येथे करण्यात येणार आहे तरी या शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या कुटुंबीयांना मोठे बळ मिळो हीच गावकऱ्यांकडून व भाविक भक्ताकडून प्रार्थना करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात सरपंच पत्नी चंद्रभागाबाई, मुलं, मुली , नात,नातू,पंतू आहेत त्यांच्या निधनाने काईतवाड परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.