नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – ड्रॉ.गोपछडे खाजदार झाल्या पासून केंद्राकडून जिल्यातील रेल्वे प्रश्न,विविध विकास प्रश्न,पक्षाचे संघटण,असतील की हे अधिक सक्रिय झाले आहेत जिल्यातील एकमेव असलेले श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमच्याची आधुनिकीकरण साठी त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांच्या कडे मागणी केली आहे.
नांदेड शहर हे श्री गुरु गोविंद सिंघ जी यांची पावन नगरी आहे.शहरातील क्रीडाभवन वाढविण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
हे स्टेडियम स्थानिक क्रीडा प्रतिभेला तर प्रोत्साहन देईलच पण प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी देखील योग्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देईल.ज्यामुळे परिसरातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतील.प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा पटुंना उत्तम क्रीडा मंच म्हणून देशात हे स्टेडियम लोकप्रिय होईल असा विश्वास आहे.