नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव-तालुक्यात पाच फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पांदण रस्ता अतिक्रमण खूला करण्यास नायगाव येथील तहसीलदार धम्माप्रिया गायकवाड यांच्या आदेशानुसार महसूल विभागा अंतर्गत समावेश असणाऱ्या पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त कार्यक्रमांतर्गत मौजे सालेगाव– हुस्सा शिव पानंद रस्ता आदेशानुसार मंडळ अधिकारी कुंटूर आर.के.पवार तसेच ग्राम महसूल अधिकारी राहेर डाकेवाड, ग्राम महसुल अधिकारी सालेगाव कदम पी.एस यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण रस्त्याची पाहणी केली गट न शेजारील पांदण रस्त्या संदर्भात थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत पाणंद रस्त्याला लागून असणारे गट नंबर 430,432,433 मधील सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने वहिवाट करण्यासाठी अतिक्रमण मुक्त करण्यात आला असून सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीने पांदण रस्ता मुक्त व अतिक्रमण मुक्त मोहीम चालू करण्यात आली आहे उपस्थित शेतकरी सह मंडळ अधिकारी आर के पवार तलाठी गावातील नागरिक .शेतकरी उपस्थित होते.