नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव : तालुक्यातील मौजे हुसा येथे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीला उपस्थित व्ही पी के उद्योग समूहाचे चेअरमन श्री मारोतराव कवळे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले आहे सदर शेतकऱ्यांची बैठक ही हुस्सा येथील श्री द्वारकाधीश मंदिर येथे आयोजित केली होती या बैठकीचे आयोजन हुस्सा येथील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी श्री शरद शेषराव पाटील यांनी केले असून या बैठकीस गावातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याने प्रतिसाद देत मारोतराव कवळे गुरुजी यांना ऐकण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद देत श्री कवळे गुरुजी यांच्याकडून सखोल असं मार्गदर्शन घेतले आहे.
सदर शेतकरी बैठकीसाठी गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की शेतकऱ्यांनी समृद्ध व सुजलाम सुफलाम होण्यासाठी शेतकऱ्यांनी शेताचे सूक्ष्म व्यवस्थापन करून पारंपारिक शेती करण्याऐवजी आधुनिक व अधिकचे उत्पन्न होण्याकरिता शेतकऱ्यांनी जोड व्यवसायासह ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करावे आणि उसाचे उत्पन्न एकरी 80 ते 90 टन उत्पन्न काढून उत्पन्नात भरमसाठ वाढ करावी मागील काळात कारखान्याच्या गैर सुई मुळे शेतकऱ्यांचा ऊस तोडला गेला नसून शेतकऱ्यांचा त्यावेळी मोठं नुकसान झाले असल्याचेही कवळे गुरुजी यांनी सांगितले आहे. पण सध्या परिस्थितीत तुमच्या सेवेसाठी व तुमच्या मोठ्या आशीर्वादाने आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी आम्ही योग्य भावासह भागाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी एकूण तीन ते चार कारखाने काढून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतामधील सुनियोजन व व्यवस्थापन करून आधुनिक शेती केली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आपल्या भागातील शेतकऱ्यांना जरी अडचणी निर्माण झाली असल्या तरी आपला कारखाना म्हणून आम्ही त्यांना काही प्रमाणात मदतही करू आणि तुमचा ऊस वेळेवर नेऊ असेही कवळे गुरुजी यांनी म्हणाले.
शेती व्यवसाय बरोबर शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय जर सुरू केला तर त्यांच्या उत्पन्नात अजून मोठी वाढ होऊ शकतो कारण असे की, जनावरांपासून मिळणारे दूध जास्तीचं मिळत असेल तर ते दूध आमच्याकडे दूध डेरी उपलब्ध आहेत त्या दूध डेअरीला सुद्धा आणू शकता आणि या जनावरापासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा देखील साठा उपलब्ध होऊ शकतो या सेंद्रिय खतामुळे शेतातील उत्पन्न अधिक होऊ शकतो. सेंद्रिय खत शेतामध्ये वापरल्याने जमीन ही भुसभुशीत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी मदत होऊ शकतो.
पुढे कवळे गुरुजी म्हणाले की या भागातील शेतकऱ्यांनी कितीही ऊस लावला तरी शेतामधी एकही टिपरू राहू देणार नाही असेही विश्वास देऊन शेतकऱ्यांना सूक्ष्म असे मार्गदर्शन केले आहे. एकंदरीत पाहता ऊस लागवडीसाठी कमीत कमी खर्च लागत असून आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा व जास्तीत जास्त उत्पन्न होऊन शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे मार्ग होऊ शकतो. या भागातील शेतकरी समृद्ध होण्याकरिता आम्ही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रात्रंदिवस फिरून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो पण यातील बरेच शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडे लक्ष घातल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असतो शेतातील पुरांच्या पाण्याने शेत जमीन व पीक उद्ध्वस्त होऊन शेतकरी हवालदिन होऊन जातो. उसाची जर लागवड केल तर ती पावसामध्ये कुठल्याच प्रकारची हानी होऊ शकत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे जमिनी कमी मात्र उत्पन्न जास्त त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आधुनिक शेती व जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील सध्या परिस्थितीत सुख समृद्धी व सुजलाम सुफलाम झालेले आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मात्र पारंपारिक शेतीकडे अधिक भर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नैराश्य जनक वातावरण निर्मिती होऊन शेतकरी पारंपारिक पिकामध्येच गुंतून जातो त्यामुळे शेतकरी आत्महत्या च्या दारामध्ये जाऊन पोहोचतो राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये एकही आत्महत्या होत नाही आणि मराठवाडा मध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतात तेव्हा शेतकऱ्याने खचून न जाता शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे लक्ष वेधून व सूक्ष्म व्यवस्थापन करून शेतामध्ये पीक घेण्याची गरज आहे. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात पाणी साठा आहे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असून त्या पाण्याचा शेतकऱ्यांनी योग्य वापर करून शेतामध्ये ऊस लागवड करण्यात यावी असेही कवळे गुरुजी म्हणाले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गोपीनाथराव दत्ताराम पाटील हंबर्डे कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून व्ही पी के उधोग समूहाचे चेरमन व शेतकरी नेते श्री मारोतराव कवळे गुरुजी, नागेश पाटील डोईफोडे इज्जत गावकर, जनसंपर्क अधिकारी उमाजी नागरे साहेब, श्री वाघ साहेब, ऊस पुरवठा अधिकारी,श्री जाधव साहेब, गजानन सांगवीकर, हूस्सा येथील श्री अशोक राव पाटील, शरदराव शेषराव पाटील हंबर्डे, सरपंच प्रतिनिधी रमेश पाटील हंबर्डे, श्री गणपतराव पाटील डोईफोडे, श्री शेषराव दत्ताराम पाटील हंबर्डे, श्री यादव पांचाळ, दतराम पाटील, रामदास दशरथा पाटील, मधुकर दशरथा पाटील,कमल किशोर रामराव पाटील, मधुकर गणोजी पाटील, गणपती दत्तराम पाटील, शंकर दतराम पाटील, गोविंद कमल किशोर हंबर्डे, महेश आनंदराव हंबर्डे, रावसाहेब किशनराव शिंदे, आदी मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी उपस्थित होते.