वानोळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची भेट…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माहूर प्रतिनिधी पंडित धुप्पे 

माहूर तालुक्यातील वानोळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांचे सोबत माहूरचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेत अभिनव कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे अभ्यासिका हॉलचे उद्घाटन करण्यात आले. अभ्यासिका हॉलमधील आसन व्यवस्था,विविध अभ्यासाची पुस्तके,यांची निरीक्षण त्यांनी केले. शाळेची सुंदर सजावट व विविध फुलांची झाडे आणि महापुरुषांची प्रतिमा या सर्व निसर्गरम्य वातावरण बघून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवल यांनी शाळेची प्रशंशा केली.मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्याने गीत गाऊन स्वागत केले. वानोळा ग्रामपंचायत च्या वतीने सीईओ व बिडिओ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्रप्रमुख राजकुमार राठोड यांनी करताना गावकऱ्यांनी शाळेसाठी कार्तिक मंडळाच्या वतीने एक लाख रुपये भेट दिली असून सुंदर शाळेतील गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी मला सहकार्य केल्याची सांगितले अभ्यासिकेच्या माध्यमातून रोज सकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेतले जाते शाळेत सीसी टीव्ही, प्रोजेक्टर असून आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याचे यावेळी सांगितले शाळेचे सर्व शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील अनेक मुले याकरिता सहकार्य करतात असे प्रस्ताविक करताना सांगितले यावेळी कार्तिक मंडळाचे दशरथ राठोड सवई राठोड, गोविंद राठोड व अभ्यासिकेसाठी मदत करणाऱ्या नितीन जाधव, अक्षय राठोड, हर्षल राठोड,किशोर विभुते,राहुल जाधव या मुलांचे व त्यांच्या कुटुंबांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे हस्ते करण्यात आले.उपस्थित विद्यार्थी, पालक, गावकरी,आणि प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या समुदायासमोर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी मार्गदर्शन केले मी एका चहा विक्री करणाऱ्या आजोबाची नात आहे आज आयएएस होऊन तुमच्यासमोर उभी आहे तसेच तुम्ही पण मोठे अधिकारी बनू शकता त्यासाठी मोठे स्वप्न पहा,अभ्यासिके तून जिद्द व आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यातूनच अधिकारी बनले जातात असे मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.यावेळी वानोळा गावचे सरपंच सुनीता सिडाम, उपसरपंच अभिजीत राठोड, विद्यालयाचे कृष्णकुमार राठोड, वाय एच जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी राठोड,कुपटी चे सरपंच प्रफुल भुसारे पाटील,मुख्याध्यापक पोतूलवार,डॉक्टर शिवाजी आत्राम,पत्रकार पंडित धुप्पे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अरगूलवार यांनी केले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!