शहरात व गावपातळीवर असलेल्या रास्त भाव दुकानांमध्ये ई केवायसी निःशुल्क प्रकिया सुरू…
अभिषेक बकेवाड| हिमायतनगर शिधापत्रिकेवर वितरित धान्य वितरणाच्या लाभार्थीची माहिती अद्ययावत करण्यासाठी पडताळणी प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्याचे निर्दे श दिले आहे .
शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही फेब्रुवारी 2025 अखेर पर्यंत करावेत असे आवाहन तहसीलदार मॅडम पल्लवी टेमकर यांनी केले आहे.
ई-केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी असे तहसीलदार टेमकर मॅडम यांनी म्हटले आहे.
ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे, हा एकमेव उद्देश आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थनि आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे.
तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसीसाठी निःशुल्क प्रक्रिया सुरू आहे ई-केवायसी पडताळणीसाठी लाभाध्यानी आधारकार्ड सोबत घेऊन रेशन दुकानात येणे आवश्यक आहे.
ई के वाय सी पूर्ण झाल्यावरच लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे.
ई-केवायसी पुर्ण न केल्यास अन्नधान्य लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार संबंधित लाभार्थ्यांची असेल यांची नोंद घ्यावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रियांका धोटे मॅडम यांनी केले आहे*