कर सहाय्यक व महसूल अधिकारी पदी निवड.
संपादक अभिषेक बकेवाड
नांदेड –हिमायतनगर तालुक्यातील वडगाव येथील हनुमान इरबा कुरेवाड यांनी अतिशय जिद्दीने व चिकाटीने मेहनत करून एमपीएससी परीक्षेत मजल मारली आहे व त्यांची निवड कर सहाय्यक व महसूल अधिकारी सहाय्यक पदी झाली आहे.
हनुमान इरबा कुरेवाड हा विद्यार्थी शेतकरी सामान्य कुटुंबातून असून त्यांचे आई-वडील काबाडकष्ट करून मुलाला शिकविले व मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मजल मारून जीवनात आमुलाग्रह बदल घडवून आणला आहे. व आई-वडिलांचा नावाचा ठसा समाजात उमटविला आहे. आणि हनुमान करेवाड हा NT-B प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांक पाठविला असून हनुमान कुरेवाड यांचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले असून त्यांना बालवयातून शिक्षणाची आवड व क्रीडा क्षेत्रात आवड होती पुढे माध्यमिक व कॉलेज जीवनात अतिशय मेहनतीने एसएससी व एच एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या प्रकारे मार्क्स विद्यार्थी पुढे एमपीएससी मध्ये मजल मारून जीवनाचा यशस्वी पल्ला गाठला आहे.
हनुमान कुरेवाड यांनी गोरगरीब शेतकरी सन्माननीय वर्गातील जनतेची सेवा करण्याकरिता भविष्यात यशाचा निश्चय मनाशी बाळगून एमपीएससी परीक्षेत मजल मारत समाजाप्रती आदर्श निर्माण केला आहे. हनुमान कुरेवाड यांचे आई-वडील शेतकरी कामगार असून शेतातील काम करून मुलांना शिक्षण देऊन शिक्षणाचे महत्त्व सांगत मुलांच्या आयुष्यामध्ये शैक्षणिक भर घालून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे.
हनुमान कुरेवाड यांच्या यशाबद्दल गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बाबाराव जरगेवाड, हिमायतनगर तालुका अध्यक्ष सुभाषराव शिल्लेवाड यांनी शुभेच्छांचा दिले आहे व समाजाजातून गावातून मित्रपरिवारातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसून येत आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आले आहे.