नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – निथव्यापाराचे निमित्त करून भारतात आलेल्या इंग्रजानी दीडशे वर्ष राज्य केले, त्या इंग्रजांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे अनुकरण आम्ही करतो.परंतु भारतीय संस्कृतीत धर्म ग्रंथ, संतांच्या अभंगाला शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान मिळाले नसल्याने आम्ही शैक्षणिक दृष्ट्या इंग्रजांच्या गुलामीत असल्याचे मत ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकर यांनी कीर्तन सेवे दरम्यान बोलताना भावना व्यक्त केल्या.
लालवंडी ता.नायगाव येथील सिध्देश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी अखंड शिवनाम, हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. काल्याच्या कीर्तना दरम्यान बोलताना लाठकर महाराज म्हणाले भगवत गीता,संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराजासह अनेक साधु संतांचे साहित्य धर्म ग्रंथ भारतीय संस्कृतीला धरून असून सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात भारतीय ग्रंथ साहित्याचा भर टाकणे गरजेचे आहे.परंतू सध्याचा अभ्यासक्रम आणि भारतीय जिवनशैली याचा ताळमेळ घालणारी नाही.म्हणून शैक्षणिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी धर्म ग्रंथ संत साहित्य याचा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा असे ते म्हणाले.यावेळी बाबुराव लंगडापुरे, वसंत माने, शंकर लाब्दे, विकास भुरे,भागवानराव लंगडापुरे, राजेश लंगडापुरे सुप्रसिद्ध मृदंगाचार्य विश्वेश्वर जोशी, रमेश खैरगावकर, साईनाथ खैरगावकर, बालाजी चौधरी, व्यंकटराव इंद्रे, गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.