पंचायत समितीच्या मनमानी कारभारावर जनतेत चर्चा.
नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे.
नायगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉकची तीन मीटर पेक्षा रुंदीची कामे करण्यात येऊ नये असे मनरेगा आयुक्त नागपूर यांचे आदेश आहेत पण कोठाळा ता. नायगाव येथे शासनाचे आदेशांचे उल्लंघन करत कामे होत आहे या नियमबाह्य कामांना कुणाचा पाठिंबा आहे अशी चर्चा होत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू तर आहेच पण कामे करताना शासकीय नियम गुंडाळून कामे सुरू होती. त्यामुळे ६0-४0 या अनुपात पाळण्यात येत नव्हता परिणामी मनरेगा आयुक्त नागपूर यांनी नवीन कामे तर नकोच पण वर्क कोड दिलेली कामे सुरू न झाल्यास ती कामे करण्यात येऊ नये असे आदेश ४ डिसेंबर २०२४ रोजी दिले होते. तरीही नायगाव पंचायत समितीने तालुक्यात तब्बल 29 कामे सुरू केली आहे आदेश डावलून सुरू करण्यात आलेल्या कामांना गट विकास अधिकारी व रोजगार सेवक यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस येतात गट विकास अधिकारी एल. आर. वाजे यांनी सदर कामाची सारवासारव करण्यास सुरुवात केली असली तरी पेव्हर ब्लॉकची कामे नियम गुंडाळून करण्यात येत आहेत मनरेगातून कुशल कामे करण्यासाठी ९०. १० या हेडखाली सिमेंट रस्ते व फेवर ब्लॉकची कामे येतात मात्र या कामातही अनियमितता होत असल्याने मनरेगा आयुक्त नागपूर याने ऑक्टोंबर २०२४ मध्ये तीन मीटर रुंदी सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉकच्या कामांना मंजुरी देऊ नये व दिली असेल आणि काम सुरू झाले नसेल तर ते रद्द करण्यात यावे अशी आदेश दिले होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात ग्रामपंचायत गावातील मंदिरे, अंगणवाडी, शाळा,समाज मंदिर,,व मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक ची कामे केली जातात.
मनरेगा आयुक्तांच्या आदेशानंतर अशा प्रकारची कामे बंद होणे अपेक्षित असताना आर्थिक तडजोडी करून कामे सुरूच ठेवण्यात आली आहेत. नायगाव तालुक्यातील कोठाळा येथे तीन मीटर पेक्षा जास्त रुंदीची कामे करण्यात येत आहे याकडे लक्ष वेधले असता पंचायत समितीच्या यंत्रणा कानावर हात तोंडावर बोट ठेवून बसली आहे. नियम बाह्य कामातून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अशा कामाला पाठिंबा देण्यात येत आहे.