विजय कांबळे Already होतकरू तरुणाला मदत करताना आत्मिक समाधान मिळतो!- प्रशांत राठोड, मुंबई 

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

माहूर ता.प्रतिनिधी/

माहूर – दि.१८ फेब्रुवारी: ” विजय कांबळे सारख्या एका होतकरू तरुणाला त्याच्या तुटपुंज्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी मदत करुन त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा या माणुसकीच्या भावनेतून आज एका भव्य अशा श्री दत्त कृपा टी स्टॉलचे उद्घाटन करताना मला मोठे आत्मिक समाधान मिळाले आहे.

यातून कांबळे यांचेही जीवनमान नक्कीच उंचावेल! अशा सद्भावना प्रशांत राठोड यांनी व्यक्त केल्या.

   तालुक्यातील पालाईगुडा येथील स्व.पिपळीबाई पुरसिंग राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र प्रशांत पुरसिंग राठोड यांच्या हस्ते माहूर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील श्री दत्त कृपा टी स्टॉल चा उद्घाटन सोहळा सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

जवळपास तीस वर्षांपासून आपल्या मनमिळाऊ व गोड स्वभावाप्रमाणेच चहा प्रेमी नागरिकांना आपल्या लज्जतदार गरमागरम चहाची माफक दरात सेवा देत असलेले विजय कांबळे यांचा तालुक्यातील दत्त मांजरी,श्री दत्तशिखरगड,दत्तनगर ते श्री दत्त कृपा टी स्टॉल पर्यंतचा जीवनप्रवास खडतर ठरला असून,त्यांचे आजपर्यंत तहसीलच्या प्रशासकीय इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वाराजवळील बाजुच्या जागेवर एक छोटेशे ताटव्याचे चहाचे दुकान होते.ज्याचे आज तालुक्यातील पालाईगुडा येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे राहत असलेले दानशूर व्यक्तींमत्व प्रशांत पुरसिंग राठोड यांनी मोठ्या मनाने दातृत्वभावना दाखवत पुढाकार घेऊन केलेल्या भरीव आर्थिक मदतीने एका भव्य टी स्टॉल मध्ये रुपांतर झाले आहे. त्याचे उद्घाटन आज दि.१७ रोजी त्यांच्याच हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ.निरंजन केशवे,कॉ.शंकर सिडाम यांनी होतकरू चहा विक्रेते विजय कांबळे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी 

बड़ा वह नहीं होता है जो 

आसमान में परचम लहरा दे,

बल्कि बड़ा वह होता है 

जो छोटे को भी बड़ा बना दे!

अशा शायराना शब्दांत दानशुर व्यक्तिमत्त्व प्रशांत राठोड यांची स्तुती केली.

श्री दत्त कृपा टी स्टॉल चे उद्घाटनानंतर झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे होते.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष नाना लाड, भाजपाचे ओबीसी प्रदेश सचिव अनिल वाघमारे, डॉ.निरंजन केशवे, डॉ.अभिजीत अंबेकर,कॉ.शंकर सिडाम, कॉन्टॅक्टर विजय राठोड, गौतम महामुने,राकॉं.अजित पवार पक्षाचे ता.अ. अमित राठोड, शिवसेना उबाठा शहर प्रमुख निरधारी जाधव, पत्रकार बजरंगसिंह हजारी, दत्ता शेरेकर या प्रमुख पाहुण्यांसह पत्रकार विलास आडे, इलियास बावानी,

गजानन भारती, वसंत कपाटे, नंदकुमार जोशी,राज ठाकुर, बाबाराव कंधारे, गणेश खडसे यासह प्रतापसिंह हजारी, अजयसिंह हजारी, विजयसिंह हजारी,रोहनसिंह हजारी,पवन शर्मा, समाधान पाऊलबुद्धे,किनवट येथील सागर हजारी,कपिल हजारी, दयाराम जाधव, वसंत जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सुत्रसंचलन अर्जुन जाधव यांनी तर आभार प्रदर्शन टी स्टॉल चालक विजय कांबळे यांनी केले.यावेळी किनवट,माहूर तालुक्यातील स्व.पिपळीबाई पुरसिंग राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सन्मानार्थ बंजारासमाजातील नागरिकांसह सर्वधर्मीय जनसमुदाय व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!