हिमायतनगर नगरपंचायत येथे 27 फेब्रुवारी ई केवायसी शिबीराचे आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर ता.प्रतिनीधी/बाबाराव जरगेवाड 

हिमायतनगर -अन्न व पुरवठा विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने शिधापत्रिका ई केवायसी तसेच आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्याकरिता दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00ते 4:00 पर्यंत

 हिमायतनगर शहरातील नगरपंचायत येथे सुविधा केंद्राच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, नागरिकांनी सोबत आधार कार्ड, शिधापत्रिका व मोबाईल सोबत आणावेत. सदरील उपक्रम हा मोफत असून कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नसून, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर व पुरवठा निरीक्षण अधिकारी धोटे मॅडम यांनी केले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी हिमायतनगर शहरातील रास्त भाव धान्य दुकानदार परिश्रम घेत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!