स.महिंदरसिंघ संधू यांचे निधन..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड/ प्रतिनिधी

नांदेड – शहरातील अबचलनगरमधील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक,गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते स.महिंदरसिंघ संधू यांचे दि. १९ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांनी औरंगाबादमध्ये ऑडिटर म्हणून शासकीय नोकरी केली. नंतर राजीनामा देवून शासकीय गुत्तेदार म्हणून अनेक वर्षे काम केले. ते बी.ए.एल.एल.बी.होते. त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी सायंकाळी नगिनाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, जावई, सूना,नाती, पणतू असा परिवार आहे. विश्वासू प्रवासी संघटनेचे सदस्य,भाजपाचे कार्यकर्ते, पत्रकार, अभियंता हरजिंदरसिंघ संधू यांचे ते वडिल होत.

Share This Article
error: Content is protected !!