1995 ला समाज कार्यात सहभागी होऊन आज पर्यंत त्यांची अविरत समाज सेवा चालू आहे...
विशेष लेख लोकतंत्र न्युज✒️
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नामांकित व्यक्तीमत्व भुमन्ना आक्केमवाड या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. भुमन्ना आक्केमवाड हे एक असेच उमदे,दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत.त्यांचा आज भुमन्नाजी आक्केमवाड यांचा वाढदिवस…यांची आज एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही.तर समाजकारण आणि राजकारणात अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज,सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे.
निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे.कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच..!मनात कुणाबद्दलही आकस ,राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे.
भुमन्ना आक्केमवाड सामाजिकपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी,त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते, गोल्ला गोलेवार यादव सामाजात आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणाला योग्य दिशा देणारे हे पहिले व्यक्तिमत्व आहे.
आक्केमवाड साहेब यांच्या मध्ये एक छान दिलदार व गर्व नसलेला उत्तम अंग असलेला व्यक्ती स्वभाव दडलेला आहे गोल्ला गोलेवार यादव समाजासाठी अहोरात्र मेहनत करणारे. त्यांचे राजकीय करियर 1992 ला यशवंत महाविद्यालय नांदेड येथे एन यू आय चे वर्ग प्रतिनिधी सी आर पदी निवडून आले. त्यानंतर 1995 ला समाज कार्यात सहभागी होऊन आज पर्यंत त्यांची अविरत समाज सेवा चालू आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री अशोकरावजी चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू म्हणून त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली असून, ते 19 वर्ष सलग सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांचे राजकीय पदाधिकारी म्हणून कार्य करणारे व्यक्तिमत्व मानले जातात, राजकीय संतुलन ठेवून त्यांनी सामाजिक व व्यावसायिक संघटनेत मोलाचे योगदान दिले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून 7 वर्ष व गेल्या 5 वर्षा पासून महाराष्ट मुद्रण परिषदेवर आजही विभागीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. व तसेच गेल्या 20 वर्षांपासून ओबीसी संघटन मजबुत करण्यासाठी ते अहोरात्र कार्य करून ओबीसी चे नेतृत्व आजही सांभाळत आहेत..
आज 4 मार्च एक दिलदार व्यक्तिमत्त्व निस्वार्थी नेतृत्व नांदेड जिल्ह्यातील दिलखुलास व्यक्तिमत्व…. समाजाच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर व अग्रेसर आसणारे आपल्या सर्वांचे चाहते, महाराष्ट्र राज्यातील युवकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व.
नांदेड जिल्ह्यातील असून देखील ते लहान मोठ्या सर्वांना आदराची वागणूक देऊन मान सन्मान ठेवणारे हसत मूख व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गोल्ला गोलेवार यादव समाजासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होत असतात,
विकासात्मक दृष्टी व समाजकार्याची जाण असणारे नेतृत्व….समाजकारणात नेहमी सामाजिक बांधिलकीला धरून असते .ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने समाज कार्य करत असतात.
आदरणीय मा.श्री भुमन्ना आक्केमवाड साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आज आपला वाढदिवस…. !आपल्या या जीवनच्या प्रवासात नेहमीच यशाचा सुगंध दरवळत राहो.या शुभकामनेसह…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आपणास उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या मनापासून मंगलमय शुभेच्छा.., त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीस त्रिवार सलाम… !!!
शुभेच्छूक – आभिषेक बकेवाड, बाबाराव जरगेवाड
गोल्ला गोलेवार यादव समाज हिमायतनगर
