संपादक /अभिषेक बकेवाड
नांदेड – भोकर तालुक्यातील मोजे सोमठाणा या गावात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान श्री गोविंद कृष्ण गोशाळा उदघाटण सोहळा ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख विशेष उपस्थिती व्ही पिके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांची होती तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, गणेश सूर्यवंशी, संदीप जिल्हे वाड, गोविंद कोंडके, गजानन भाऊ पांचाळ, बजरंग दल कार्यकर्ते सोपान कोळगीरे, प्रांत संयोजक बजरंग दल डॉ. विजय चव्हाण पशुधन विस्तार अधिकारी, शिवाजी माने मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर गोदेवाड सरपंच सोमठाणा, बालाजी पोलवाड गो संसद हिंगोली लोकसभा क्षेत्र, राहुल कुंडलवार, बालाजी पाटील, संजय हाके, पांडुरंग गोरटकर यांची उपस्थिती होती.

गो शाळेच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त करताना व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले की गाय आपल्या जीवनात एक अतिशय महत्त्वाचा भाग असून ती एक पाळीव प्राणीच नाही तर खऱ्या अर्थान आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारी ती आईच आहे आपल्या देशात पूर्वीपासूनच गाईला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण तिच्या माध्यमातून पवित्रता व समृद्धी आपल्या घरामध्ये येते गाईच्या शेणामुळे शेतात भारी उत्पन्न घेण्यास मदत होते तर अनेक आजारावर गोमूत्र हे औषधाप्रमाणे काम करते त्यामुळे मनुष्यमात्राचे अनेक आजारावर काम करत असल्यामुळे मनुष्य जीवनाचं आरोग्य ही सुदृढ होण्यास मदत होत असल्याचं महत्वपूर्ण मार्गदर्शनमार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन व आभार सीता माता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबू पवळे सर यांनी मांडले