नांदेड तालुका काँग्रेस सेवादलाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : नांदेड तालुका काँग्रेस सेवादलाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
नांदेड जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, प्रमुख पाहुने म्हणून नांदेड दक्षिण चे लोकप्रिय आ.मा.मोहन आण्णा हबर्डे तसेच नांदेड तालुका अध्यक्ष स. राजकमल सिंग गाडीवाले यांनी कॉग्रेस सेवादलाचे संस्थापक अध्यक्ष नारायण हर्डीकर यांची प्रतिमा गांधी टोपी व पुष्प देऊन मा. आ. मोहनअण्णा हंबर्डे यांचे स्वागत केले व सेवादलाचे संस्थापक अध्यक्ष कै. नारायण हर्डीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नांदेड दक्षिणचे पदाधिकारी यांना मा.आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.

मा.आमदार यांनी नादेड जिल्हा कॉग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव धर्माधिकारी यांचे शाल,पुष्प गुच्च देउन मा.श्री.राजकमल सिग गाडीवाले मा.श्री.संजीवकुमार गायकवाड व जेष्ट कॉग्रेस पक्षाचे कार्यक्रते आहात खान पठाण,शेख लतीफ यांचे आमदार साहेब व शिवाजीराव धर्माधिकारी यांनी गांधी टोपी व पुष्प गुच्च देउन सन्मान केले आहे.

आ. मोहन अण्णा हंबर्डे बोलते वेळी,सेवादलाचे काम इतके म्हत्वाचे आहे की,काश्मिर ते कन्याकुमारी पायी यात्रा नांदेड जिल्हात प्रवेश करुन काकांडी येथे आली असता सेवादलाच्या कार्यकर्त्याना यात्रेत बोलावून घ्या असे देशाचे नेते मा.राहुल गांधी सांगितले होते असे उल्लेख करून आठवण करून देण्यात आली आहे.कॉग्रेस सेवादलाचे आर एस एस या संघटनेपेक्षा आपल्या सेवादलाचे जास्त महत्व आहे असे मार्गदर्शन केले आहे. यावेळी श्री अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा सरचिटणीस संजीवकुमार गायकवाड,नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष शेख लतीफ,ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आहात खान पठाण,किशनराव रावणगावकर, कामाजी अटकोरे,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!