बिलोली तालुका परीसरातील अनेकजन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे प्रवेश करणार – रंजित पाटील हिवराळे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगांव प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नायगाव – नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे दिनांक २३ मार्च रोजी नरसी (ता. नायगांव) येथे राष्टीयनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्यात ते स्वतः आपल्या अनेक समर्थकांसह पक्षप्रवेश करणार असून याप्रसंगी बिलोली तालुक्यातील विवीध पक्षाचे शकडो पदाधिकारी व कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रंजित पाटील हिवराळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे .

    पुढे बोलतांना रंजित पाटील हिवराळे म्हणाले की , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्र शासनातील विकसनशील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखल्या गेले आहे . त्यामुळे राज्यातील अनेक दिग्गज मंडळी त्यांच्यासोबत जुळल्या गेले आहेत त्याच धर्तीवर उद्या नायगांव तालुक्यातील नरसी येथे रविवारी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा या अभूतपूर्व कार्यक्रमाला बिलोली तालुक्यातून हजारोच्या संख्येने उपस्थिती लावा असे आवाहन तालुकाध्यक्ष रंजित पाटील हिवराळे यांनी केले आहे . यावेळी गणेश पा. नरवाडे (ता.उपाध्यक्ष ), गणेश पा. शिंदे (ता.कार्याध्यक्ष) , मिलिंद पवार (शहर अध्यक्ष बिलोली ) , गंगाधर मरकंटे (शहर अध्यक्ष कुंडलवाडी ) , शंकर पवार (ता.सरचिटनिस) आदींची उपस्थीती होती .

Share This Article
error: Content is protected !!