सावरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने क्रांती सूर्य पार्टी रुई बु यांचा बहारदार गीताचा कार्यक्रम संपन्न !!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे 

नायगाव- तालुक्यातील सावरखेड येथे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी समस्त गावकऱ्यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने क्रांती सुर्य गायन पार्टी रुई बु यांच्या वतीने शिवरायाच्या जीवनावर दिवस भर गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने व जयंती मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा भव्य सोहळा संपन्न झाला या सदरील कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रांती सुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक यांचा संच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर सुंदर असा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने हनुमान मंदिराच्या मुख्य द्वारा जवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा मा जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा घोड्यावर बसलेला उभारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूरवीर मावळे सुद्धा त्यांच्या भोवताली मोठ्या रुबाबात उभे टाकल्याचे दिसून येत आहेत
अशा या छोट्याश्या गावात सुद्धा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व जाती-धर्मातील बांधव या जयंती सोहळ्यात सहभागी होऊन राजाची जयंती मोठ्या थाटात पार पडली आहे
सावरखेड येथे जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम कृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आर टी पवार यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

रुई बु येथील क्रांती सुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार, हार्मोनियम सुरेश कागडे पार्टीचे मुख्य गायक उत्तम कांबळे, हणमंतराव वाघमारे, शाहीर माधवराव पाटील इकळीमाळ, झांजर मास्तर माधव रामजी पवार यांच्या संचाने सदरचा कार्यक्रम सादर केला आहे.

Share This Article
error: Content is protected !!