संपादक/आभिषेक बकेवाड
जिल्ह्यात नवीन तरुण नेतृत्व निर्माण होऊ नये यासाठी दोघे एकमेकांच्या विरोधात ?
नांदेड – खा. अशोक चव्हाण व आ. चिखलीकर यांनी आत्ताच एकमेकांसाठी प्रचार केला आहे आणि ते एकाच सरकारमध्ये लोकप्रतिनिधी आहेत; तेव्हा हे एकमेकांचे विरोधक कसे ?
खा. अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या प्रचारात सर्वस्व पणाला लावून चिखलीकर यांचा प्रचार केला, पण लोकांनी आपटले! विधानसभेच्या प्रचारात अशोक चव्हाण व चिखलीकर महायुतीच्या प्रचारात अनेकदा एकत्र आले. आठवून पहा महायुतीच्या महत्वपूर्ण सभा! स्वतःच्या निवडणूका असले की हे लोक काहीही करून एकत्रित येऊ शकतात पण कार्यकर्त्यांच्या निवडणूका आल्या की, हे एकमेकांचे विरोधक कसे ? त्यामुळे लोकांनी यांना ओळखावे! चिखलीकरने लोह्याचा विकास साधावा, तिथे दगड धोंडे याच्या पलीकडे काहीच दिसत नाही!
काँग्रेस जिल्ह्यात सक्षम असताना; खा. रविंद्र चव्हाण हा आत्ताआत्ताचा पोरगा आपल्या सर्वांच्या पुढे जाऊ नये म्हणून काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी अशोकराव एका बाजूनी तर दुसऱ्या बाजूने चिखलीकर काँग्रेसला अडचणीत आणून भाजपाचे हात बळकट करण्यासाठी मैदानात आहेत! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही जिल्ह्यात स्थान नाही, लोहा सोडले तर कुठेच मतदार नाही. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस – बीजेपी शिवसेना आमनेसामने असतील मग आपले कसे ? म्हणून नको त्या ठिकाणी चिखलीकर राष्ट्रवादीचे शे-दोनशे फारफार तर १००० एक मतदान खाण्यासाठी उमेदवार उभे करून काँग्रेसला अडचणीत आणून भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करणार ना ? या पलीकडे काहीच नाही!
खा. रविंद्र चव्हाण दिल्लीत गेलेत, उद्या ते अजून मोठे होऊ नये म्हणून हा डाव आहे. जिल्ह्यात खा. अशोकराव चव्हाण, आ. चिखलीकर, या प्रस्थापितांच्या विरुद्ध खा. रविंद्र चव्हाण यांच्या सोबत अनेक तरुण नेतृत्वही तयार होतील मग आपल्या लेकरांचे काय होईल ? अनेक अडचणी निर्माण होतील, हाही मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे ! त्यामुळे आत्ताच काँग्रेस व खा. रविंद्र चव्हाण यांच्या पुढे आव्हान उभे करून चिखलीकर व अशोकराव एकमेकांना एकमेकांचे विरोधक दाखवत आहेत, जेव्हा की ते एकमेकांचे विरोधक नसून जिल्ह्यात भोकर, लोहा, नायगाव, नांदेड शहरात तरुण नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून एकमेकांच्या विरुद्ध आहोत, हे फक्त दाखवत आहेत!
राज्यातील महागाई, बेरोजगारी, राज्यभरातील गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, पीकविमा प्रश्न, शेतीमालाला नसलेला भाव आणि फडणवीस यांचे नेतृत्व या सर्व बाबीवर अशोकराव व चिखलीकर यांची उत्तरे काय असतील ? एकाच सरकारचे दोन्ही प्रतिनिधी असल्याने उत्तरे सरकारच्या विरोधात तर असणारच नाहीत; तेव्हा समजून घ्या, दोघे एकच आहेत!
नरसीची सभा म्हणजे मला पहा आणि फुले वाहा, असा कार्यक्रम!
माजी खासदार खतगावकर यांनी खरेतर आता त्यांची प्रकृती व वय पाहता निवृत्ती पत्करली पाहिजे. परंतू मागच्या एका वर्षात त्यांचा तिसरा पक्ष प्रवेश दिसून येतो आहे. नरसी येथील अजित पवारांच्या सभेला लोक गाड्या भरवून आणावी लागणार आहेत, त्यांना जेवण द्यावे लागणार आहे, तरीही लोक येऊन चुळबूळ न करता बसतील यावर माझ्या सगट कुणाचाच विश्वास नाहीये! म्हणून ही सभा स्टेज वरील लोकांसाठी मला पहा व फुले वाहा इतक्या पुरतीच मर्यादित असणार आहे. त्याची कुठलीही राजकीय स्थित्यंतरे असणार नाहीत!
तेव्हा नांदेड वासीयांनी या सर्वांना ओळखा, ही एकमेकांची विरोधक नसून आतून सर्व एकच आहेत! जिल्ह्यात प्रा. रवींद्र चव्हाण व त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध मतदारसंघात नवीन तरुण नेतृत्व निर्माण होऊ नयेत व त्यामुळे आमच्या लेकरांचे कसे होणार ? यासाठी हे काळजीत आहेत म्हणून ते आता खोटे खोटे एकमेकांच्या विरोधात आहोत हे भासवत आहेत, बाकी काहीच नाही!

प्रा संदीपकुमार देशमुख बारडकर
भोकर विधानसभा मतदारसंघ
9923909175