अवैध उत्खनन झाल्याबाबतचा पंचनामा तहसीलदाराकडे सादर 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

वानोळा येथील १५० ब्रास च्या रॉयल्टी वर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन प्रकरण

माहूर : प्रतिनिधी पंडित धुप्पे

माहूर – तालुक्यातील वानोळा शिवारातील एका शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी घेऊन २ हजार ब्रास पेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते पंडित धुप्पे यांनी तहसीलदार माहूर यांच्या कडे केली होती त्या तक्रारीनुसार दि.19 मार्च रोजी वानोळा महसूल मंडळ अधीकारी एस.के.साळसुंदर ,ग्राम महसूल अधीकारी अनिता कुडमेते यांनी जायमोक्यावर जाऊन अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी पंचनामा दि. 20 मार्च रोजी तहसीलदार माहूर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

     सा.बा. विभाग माहूरच्या वतीने वानोळा ते मेंडकी या 3 कि.मी.च्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून त्याकरिता 5 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमची आवश्यकता असल्याने सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराने वानोळा परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतातून 150 ब्रास मुरूम ची रॉयल्टी भरली, परंतु प्रत्यक्षात मात्र 2 हजार पेक्षाही जास्त ब्रास मुरुमचे उत्खन करून शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला असल्याची तक्रार वानोळा येथील सामाजिक कार्यकर्ता पंडीत धुप्पे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट व तहसीलदार माहूर यांच्याकडे तक्रार सादर केली होती.त्यामुळे माहूर तहसीलदार किशोर यादव यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मंडळ अधीकारी वानोळा यांना पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी तक्रारदार पंडित धुप्पे यांच्या समक्ष पंचनामा करून रॉयल्टी पेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचा अहवाल तहसीलदार माहूर यांना सादर केला असून भूमिअभिलेख विभागाच्या ईटीएस मोजणीतून नेमके किती अवैध उत्खनन झाले ? हे स्पष्ट होणार आहे. आता या प्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी,कंत्राटदार, ज्या शेतकऱ्याच्या शेतातून अवैध उत्खनन केले त्या शेतकऱ्यावर होणाऱ्या कार्यवाही कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
error: Content is protected !!