उमरी तालुका प्रतिनिधी/उध्दव मामडे
उमरी – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यानंतर व मोठ्या प्रमाणात लाखो जनतेने पक्षला व ना आजीत दादांना मोठ्या प्रमाणात आशिर्वाद देऊन राज्यात महायुतीचे शासन स्थापन झाले नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नवनियुक्त आ प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर. जिवनराव घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
आता नांदेड जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष जिल्ह्यातील राजकारणात धुरंधर राजकारणी दूर दृष्टिकोन असणारे नेते म्हणून संबंध नांदेड जिल्हा ज्यांच्या कडे पाहतो असे भास्करराव पाटील खतगावकरकर व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा डॉ मीनलताई खतगावकर व त्यांचे हजारो समर्थक राष्ट्रवादी कोन्ग्रेस पक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना अजित दादा पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे ना बाबासाहेब पाटील आ बिक्रम काळे जिल्ह्याचे नेते आ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहेत हा पक्ष प्रवेश सोहळा जिल्ह्याच्या राजकारणात लक्षवेधी तर ठरणारच असून भविष्यातील राजकारणात नायगाव व देगलुर विधानसभा मतदार संघाला राष्ट्रवादी कोन्ग्रेस पाक्षला महायुतीला प्रचंड मोठी ताकद देणारा आहे नांदेड जिल्ह्यातील व नायगाव देगलुर बिलोली धर्माबद्द उमरी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी नरसी येथे होणार्या ना अजित दादा यांच्या उपस्थितीत प्रवेश घ्यावा व हजारो कार्यकर्त्यांनी होणार्या जाहीर सभेस उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कोन्ग्रेस चे प्रदेश सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख तळेगावकर यांनी केले आहे.