उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे
उमरी – संत ज्ञानेश्वर माऊली संगीत विद्यालय, उमरी येथे 2024 – 25 या शैक्षणिक वर्षातील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायनाच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सूरुवात मां सरस्वती यांची पुजा मा. कुलकर्णी सर ( गट शिक्षणाधिकारी उमरी) तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल्यावर सरस्वती गित सादर करण्यात आले.
या कार्यक्रमचे विशेष आकर्षण तथा मुख्य अतिथि मा. कुलकर्णी सरांचे विद्यालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली संगीत विद्यालयाचे संचालक श्री.गायकवाड सरांनी शाल,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील विद्यार्थी आपल्या मधूर आवाजातून गायणाच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यात काही विद्यार्थी प्रारंभिक (प्रथम परीक्षा)
कु.आरोही सुरबुलवाड, कु.शितल तोटेवाड, कु.शुभ्रा लोकरे, *कु.तन्वी हणमंतराव जाधव*, कु.सिद्धिका टेकाळे, कु.श्रावणी कप्पावार, कु.दुर्गा कप्पावार, कु.सान्वी पोतदार, कु.गौरी जाधव, कु.द्वारकामाई हैबते ह्या विद्यार्थी प्रथम परिक्षेत विशेष प्राविन्य मिळवले आहेत.तर कु.अनुष्का चाटोरीकर, कु.आराध्या मराठे यांनी प्रवेशिका प्रथम म्हणजे द्वितीय परीक्षेत घवघवित यश प्राप्त केले आहे.
तृतीय परीक्षा त्यास प्रवेशिका पूर्ण म्हणून ओळखले जाते त्यामध्ये कु.खुशी टीप्रेसवार, कु.सबुरी इंगळे यांनी अप्रतिम यश प्राप्त केले.या सर्व विद्यार्थ्यांचे तथा पालकांचे विषेश प्राविण्यासहीत पास झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा! देण्यात आल्या.
उपस्थित विद्यार्थीना तथा पालकांना मा. कुलकर्णी सरांचे संगीताबद्दल मनोगत ऐकायला मिळाले.त्यांनी आपल्या मनोगतात ,मानव जीवन आनंदीमय बनवण्यासाठी संगीत साधना खुप महत्वपूर्ण भुमिका कशी निभावते या बदल सविस्तर मागदर्शन केले. संत ज्ञानेश्वर माऊली संगीत विद्यालयातून उमरी शहरात संगीताचे बीज रोवले जात आहे. या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संगीतात आपली प्रगती वाढवून घ्यावी व संगीत विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत असल्या बद्दल श्री.नंदकुमार कुलकर्णी साहेबांनी संगीत विद्यालयाचे संचालक संगीत विशारद श्री.गायकवाड सर यांचे अभिनंदन केले. या नंतर या कार्यक्रमांचे आभार मा. मोटरवार सर यांनी केले.