जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायच्या वतीने गुढीपाडवा निमित्त भव्य दिव्य शोभायात्रेच आयोजन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी – नांदेड दि.22 मार्च 2025 अनंत विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम रत्नागिरी यांच्या दिव्य प्रेरनेने राज्यभर हिंदू नववर्ष, चैत्र प्रतिपदा व वसंतऋतू चा पहिला दिवस म्हणजे गुडीपाडवा, यशाचा व कीर्तीचा तथा प्रभू रामचंद्र रावणाला पराभूत करून अयोध्या ला आगमन केल्याचा दिवस असल्यामुळे हा विजयाचा दिवस मानला जातो.

 भारतीय संस्कृती चे जतन व वारसा पुढील पिढीसाठी आदर्श राहावा यासाठी सालाबादा प्रमाणे संप्रदायाचे गुरुबंधू, भगिनी संप्रदायिक वेशभूषेत 30 मार्चला सकाळी 7.00 वाजता जिल्हानिहाय सोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 नांदेड येथील चेतन्य नगर शिव मंदिर येथून 30 मार्च ला सकाळी 7.00 वाजता भव्य शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे तसेच वामनराव फावडे मंगल कार्यालय येथे सागंता होणार आहे.

 शोभयात्रेत,जगद्गुरूश्री यांची प्रतिमा,प्रभू राम दरबार, संत मेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत घोडेस्वार, वीरांगना लक्ष्मीबाई,क्रांतिवीर बिरसामुंडा, भारतमाता,यांचा समावेश असणार आहे.

शोभयात्रेत प्रेम आनंद व उत्साहासाठी युवा, युवती कडून बाईक रॅली,भजनी मंडळ, कलशधारी, गुढीधारी महिला भगिनी, झेंडे,पताका, ढोल, तासा चा गजर आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे.

या यात्रेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाचे जनकल्याणकारी सामाजिक उपक्रमाची जनजागृती, केली जाणार असून रॅलीत शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य चमू व ठीक ठिकाणी अल्पोपहार व समारोप महाप्रसादाची व्यवस्था आयोजकांनी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 या गुढीपाडव्याच्या शोभयात्रेत सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन या शुभ दिनाचा यशाचा कीर्तीचा व विजयाचा आनंद घ्यावा असे आवाहन स्व स्वरुप संप्रदाय जिल्हा सेवा समिती नांदेड यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!