जामनेर तालुका प्रतिनिधी/शिवाजी जाधव
जामनेर – शेळगाव येथील उपसरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. या फाउंडेशनमध्ये मनोरुग्ण, बेसहारा तसेच मानसिक आणि बौद्धिक अपंगत्व असलेल्या लोकांची काळजी घेतली जाते.
या सामाजिक उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याचे नेते दिलीप खोडपे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्हीजीएनटी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे, वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी. जी. माळी सर, चरण सिंग पाटील, रवी माळी, आकाश बावस्कर व आत्मसन्मान फाउंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शेळगाव येथील उपसरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. या फाउंडेशनमध्ये मनोरुग्ण, बेसहारा तसेच मानसिक आणि बौद्धिक अपंगत्व असलेल्या लोकांची काळजी घेतली जाते.