नांदेड प्रतिनिधी/गोविंद चिखलवाड
नांदेड – बुद्धगया येथील महाबोधी महावितरण संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षू व बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. या मागणीसाठी नांदेडमध्ये भव्य महामोर्चा करण्यात आला होता.भारतीय बौद्ध महासभा भिक्षु संघ आणि समता सैनिक दलाच्या वतीने या मोर्चात हजारो संख्येने बौद्ध बांधवांनी भगिनींनी सहभाग घेतला होता .महामोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंढा नांदेड येथून दुपारी बारा वाजता सुरू होऊन महात्मा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकार्यालयावर धडकला.
या मोर्चात सहभागी लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचा पुन्हा एकदा पुकारा केला नांदेड मधील समस्त बौद्ध समाजाने आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून महाबोधी महाविहार मुक्ती हीच न्यायाची लढाई असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी देशभरातील बौद्ध बांधवांनी एकजूट होऊन आव्हान यावेळी करण्यात आले.
या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
महामोर्चा नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाने नांदेड शहराचे लक्ष वेधून घेतले असून पुढील काळात बौद्ध समाज याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..