हभप निरंजनभाईजी महाराज यांच्या शिवमहापुराण कथेला नायगावात मोठा प्रतिसाद…! 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार ह भ प निरंजनभाईजी महाराज यांची शिवमहापुराण कथा नायगावातील श्री साईबाबा मंदिरात सुरू असून या शिवमहापुराण कथेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या रसाळ अमृतवाणीतून परमपूज्य निरंजनभाईजी महाराज समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. ही शिवमहापुराण कथा गोसेवार्थ होत असून या कथेच्या माध्यमातून निरंजनभाईजी महाराज यांनी शिवमहापुराण कथेतील अनेक प्रसंगाचे वर्णन सांगितले आहे. शिव महापुराण कथा श्रवण केल्याने प्रत्येक मानवाला संकट काळातून मुक्त करते. जीवनातील अनेक दुःखे नष्ट होतात. भगवंताच्या कथेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राष्ट्रीय बांधिलकी जपली जाते. सर्व समाजातील लोक एकञ येतात.यातूनच एकतेचे प्रतिक जपले जाते. संत संगतीनेच जीवाचा उध्दार होतो.गुरूभक्ती करावी. गुरू हेच सर्व श्रेष्ठ आहेत.नामनामाचा जप करावा. असे सांगून कलियुगातील प्रत्येक माणसांनी धर्म रक्षणासाठी पूढे येण्याची गरज असल्याचेही सांगितले आहे.

याप्रसंगी विजय पाटील चव्हाण. विराज पाटील चव्हाण.पांडू पाटील चव्हाण. विनोद गंदेवार.मनोज आरगुलवार, पवनकुमार गादेवार, साई महाराज शहापुरे, पत्रकार रामप्रसाद चन्नावार. गजानन चौधरी, प्रल्हाद पाटील बोमनाळे.संजय कोटलवार.राजु बेळगे.सुधाकर घोडके.शिवाजी कार्लेकर. आशिष मामीडवार. ईश्वर दगडे. अतुल चालीकवार. बाबलु ठाकूर. सुभाष चलावार. शंकर बेळगे. साईनाथ बोराड.

यांच्यासह साईबाबा मंदिर पानसरे नगर संस्थानचे विश्वस्त, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पञकार. सर्व सेवेकरी साईभक्त महिला भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!