नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव – बाजार येथील पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान हे निजामकालीन बांधकाम असून ते सध्या जिर्ण झाले आहे. ते त्वरित बदलने अत्यंत गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून ची सदर पोलीस ठाणे व निवासस्थाने बदलण्याची मागणी येथील पोलीस कर्मचारी करत असताना याकडे वरिष्ठांचे व शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. याकरिता भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 25 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना येथील निजामकालीन जीर्ण झालेले पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेले निवास नवीन मंजूर करून हे त्वरित बांधकाम करण्यात यावे .यासाठी भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. नायगाव शहराचा विकास व लोकसंख्येचा विचार केला तर या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कुठलीच व्यवस्था चांगली नसून या ठाण्याला तीन जबाबदार अधिकारी व 60 कर्मचारी असा स्टाप असून यांच्या कुटुंबासाठी इथे निवासाची व्यवस्था चांगली नसल्यानेही पोलीस कर्मचारी मात्र याच निवासात राहून आपले कर्तव्य बजावतात. त्यांना किमान राहण्यासाठी एक चांगली सोय उत्तम घर सरकारने बांधून देणे गरजेचे आहे. तसे निवासस्थाने बांधण्याचे म्हटले तर जागेचा प्रश्न निर्माण होतो परंतु नायगाव शहरात अगोदरच ठाण्याच्या सभोवताल भरपूर अशी मोकळी जागा असून नांदेड जिल्ह्यातील असे एकमेव पोलीस ठाणे आहे की ज्याला जागा भरपूर आहे. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. या ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे निवास व कर्मचाऱ्यांच्या निवासाची अनेकदा डागडुजी करण्यात आली आहे ..आता डागडुजी करण्यासाठी निवास राहिले नसल्याने पावसात चोहु बाजूने पाण्याचा मारा होतो व कुटुंबांना व त्यांच्या लेकरा बाळांना राहण्यासाठी त्रास होतो .अनेक जण ठाण्यातील निवास नको म्हणून शहरात भाड्याने राहणे पसंत करत आहे.
तर काही बाहेरून ये जा करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नायगाव शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या स्तरावरून तात्काळ मंजूर केल्यास या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटेल व त्यांना ठाणे मुख्यलयात राहून आपले कर्तव्य बजावण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. अशा नायगाव शहरातील पोलीस ठाण्याच्या व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी निवेदन देऊन मागणी तर केलीच परंतु सदर प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करीतच राहणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.