नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – चार वर्षभरात चार पक्ष बदलणाऱ्या व निवडणुकीत आपण जाहीरपणे कै. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना दगाबाज केल्याची कबुली देणाऱ्या खतगावकर परिवाराने काँग्रेस कार्यकर्त्या बदल बेईमानीची भाषा वापरु नये.जे तुमच्या होटात आहे तेच पोटात आले अशा पद्धतीची खरमरीत टीका नांदेड जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती व काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय बेळगे यांनी डॉ मिनलताई पाटील खतगावकर यांच्या वर केली.
डॉ. मीनलताई खतगावकर यांनी दि. 23 रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश दरम्यान माझा असतानां पराभव काँग्रेस पक्षातीलच लोकांनी केला अशी टीका करत, त्यांचा प्रमाणीक पणे प्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अविश्वास दाखवून त्यांचा अवमान केला.
अवघ्या एका महिन्याच्या आत काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळालेल्या खतगावकर यांना ८० हजाराच्या वर मतदान मिळाले ते काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षाच्या विचाराचे मतदान आहे.यांचा त्यांना विसर पडलेला दिसतो. राजकारणात आंधळे असू नये आपल्या वागण्यात डोळसपणा असावा लागतो.तो सत्तेपासून सत्तत दुर राहिलेल्या खतगावकर कुटुंबात दिसून येत नाही.
वेळेनुसार सरड्या प्रमाणे रंग बदलण्याची वृत्ती आता तरी टाळावी आणि प्रवेश केलेल्या घरी सुखाने राहावे असा सल्ला संजय बेळगे यांनी दिला आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्यांची प्रतिमा जनमानजात काय असते ? याची जाणीव तुम्हाला जनतेने विधानसभा निवडणुकीत पराभूत करून दाखवीले आहे. निवडणुकीत हारजीत होत असते पण ती आपल्या दर्जाहीन राजकारणामुळे व्हावी हे मात्र आपल्या राजनिती वर अवलंबून असते त्याची जाणून ठेवण्याचा सल्ला दिला ही संजय बेळगे यांनी खतगावकर परिवाराला दिला आहे..