उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या संकल्पनेतुन जनावरांना पिण्याचे पाण्याची सोय बळीराजा मध्ये आनंदाचे वातावरण…!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव  प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नायगाव – नायगावचा बैल बाजार हा खुप प्रसिध्द आहे प्रत्येक तालुक्यातून व परराज्यातुन बळीराजा व मोठं मोठे व्यापारी आपले पशुधन घेण्यासाठी व विकण्यासाठी येतात आणि उन्हाळा लागला कि पाण्याचे दुर्भिक्ष्य असतेच! त्यातही आपल्या मराठवाड्यात नैसर्गिकरित्या उन्हाळ्यात वाढणारी पाणी टंचाई ही मोठी समस्या आहे.

   याच अनुषंगाने दर र्षी सातत्याने तालुक्याचा जनावरांचा आठवडी बैलबाजारात नगरपंचायतीच्या वतीने बैल बाजारात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते नायगाव तालुक्यासह परराज्यातुन येणाऱ्या जनावरांसाठी पाण्यासाठी लागणारी टाक्यांची उपलब्धता, स्वच्छ पाणी आणि विशेष म्हणजे टाकीची वारंवार स्वच्छता आदी बाबींची विशेष काळजी घेतली जाते. उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्यामुळे यावर्षीही नायगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या संकल्पनेतुन नगरपंचायतीच्या वतीने नायगाव बैल बाजारात जनावरांनां पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

     एखाद्या व्यक्तीची तहान भागवल्यानंतर मिळणाऱ्या व एखाद्या मोठ्या दानाने मिळणाऱ्या पुण्याहूनही मला या मुक्या जनावरांचे घेतलेले आशीर्वाद महत्त्वाचे वाटतात, म्हणूनच हा सेवायज्ञ प्रतिवर्षी सुरु ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील असे मत उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. या केलेल्या उपक्रमाबद्दल पशुधन बळीराजा इत्यादींनी नायगाव नगरपंचायत चे अभिनंदन केले आहे.

यावेळी नगरपंचायतीचे वरीष्ठ कर्मचारी रामेश्वर बापुले. श्रीधर कोलमवार. मुन्ना मंगरूळे. रमेश चव्हाण. सभांजी भालेराव. बंटी सुर्यवंशी. शेख मौल्ला. आदी कर्मचारी परीश्रम घेत आहेत..

Share This Article
error: Content is protected !!