उमरी ता.प्रतिनीधी/उध्दव मामडे
उमरी – डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संघटनेचे मराठवाडा सचिव,किशोर कवडीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या वतीने दि.२६ मार्च रोजी उमरी येथे जोरदार आंदोलन करण्यात आले असुन दुपारी दोन वाजता प्रमुख मागण्यांचे निवेदन उमरी स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा.अंकुश माने सर यांच्या उपस्थितीत नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक कांचन पडलवार यांना निवेदन देण्यात आले असून या आंदोलनाला उपस्थित डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र आवाज उठवत, “व्यापाऱ्यांना होणारा अन्याय थांबवा!” असा ठाम इशारा नगर पालिका प्रशासनाला देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उमरीतील सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आले होते.यावेळी उपस्थित संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर, जिल्हा प्रवक्ते पी.एन. धसाडे सर, कु.प्रियंका गायकवाड सामाजिक कार्यकर्ती, नायगाव तालुका अध्यक्ष अक्षय बोयाळ,धर्माबाद तालुकाध्यक्ष अनिल जुळणे,उमरी शहराध्यक्ष संतोष नामेवार , तालुका सचिव राम बोईवर ,सोनटक्के मुदखेड, पत्रकार , पत्रकार शिवराज मोकमपले, बंडू सावंत यांच्यासह व्यापारी वर्गातून दयालसिंग बावरी ,मोहन सिंग बावरी दाऊ गंगासागरे, अखिल शेख, ठाकूर , माधव गायकवाड, अनुसया कटकदवणे , सुशिलाबाई गायकवाड, शिल्पा वायचळकर,मधुकर गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवत आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला. या बंदला नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला, आणि या आंदोलनाला उमरी तालुक्यातील काँग्रेस चे पदाधिकारी मा.दासा पाटील यांनी पाठिंबा देऊन आपले विचार मांडले आणि हा विषय नांदेड जिल्हाचे खासदार मा.प्रा.रविंद्रजी चव्हाण साहेबांना सांगुन हा विषय मार्गी लावू असा शब्द त्यांनी दिला व या मोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शविला त्याच बरोबर धर्मविर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान चे जिल्हा प्रमुख मा.हर्षवर्धन देशमुख यांनी मोर्चात सहभागी होऊन पांठिंबा दिला व भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष मा.स्वप्निल भोसीकर, पत्रकार संरक्षण समिती चे तालुका प्रमुख मा.अशोक झडते,भिम शक्ती तालुकाध्यक्ष मा.बालाजी देवके, बहुजन जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर करडे या सर्व संघटनेने मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला आहे.