नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ मार्च २०२५ रोजी पार पडली.या बैठकीत विविध योजनांच्या १९६ प्रकरणांपैकी १७५ प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल सहाय्यक कैलास इंगोले यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिली आहे .
नायगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधारं योजना समितीच्या बैठकीत १९६ प्रकरणे तपासणीसह मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. या बैठकीत श्रावण बाळ योजनेतील ११२ व संजय गांधी निराधार योजनेचे ६३ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर २१ प्रकरणे त्रुटी असल्यामुळे नामंजूर करण्यात आली. तहसीलदारांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीत सचिव म्हणून नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर.वाजे. नायब तहसीलदार सतिश कुलकर्णी. महसूल सहाय्यक कैलास इंगोले.गुरु कदम सह महसूल कर्मचारी उपस्थित होते.