१८ वर्ष संपली तरीही इसापूर उजव्या कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेच नाही; हरित क्रांतीचे स्वप्न अद्यापही अर्धवट..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील शेतीला निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते त्यामुळे रब्बी हंगामातील पिके निसर्गाच्या भरवश्यावर अवलंबून असतात. शेतीला पाणी मिळावे म्हणून तत्कालीन आमदार कै . बापूसाहेब गोरठेकर यांच्या अथक प्रयत्नांनी व पाठपुराव्याने राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष प्रयत्नाने इसापूर उजव्या कालव्याचे काम मंजूर झाले २००६-०७ या वर्षात याचा उद्घाटन सोहळा पार पडला* आता सुमारे १८ वर्ष संपत आले तरीही इसापूर उजव्या कालव्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना दाखविण्यात आलेले हरित क्रांती चे स्वप्न अर्धवट अवस्थेत अडकले आहे.

गोरठेकर साहेबा शिवाय कोणत्याही नेत्याला या कामात दरदृष्टी दिसली नाही…

सदरच्या कामासाठी सरकारने मुबलक निधी दिला तसेच हे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश दिले पण आता पर्यंत देखील इसापूर उजव्या कालव्याचे काम शेवटचे टोक असलेल्या ठिकाण पर्यंत पूर्ण झाले नाही.त्यामुळे हा खर्च झालेला निधी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होता की गुतेदार पोसण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. कालव्याचे काम का अर्धवट अवस्थेत अडकले याबद्दल राजकीय नेत्यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

शेतीला पाणी मिळाल्या शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होणार नाही आणि उत्पन्न वाढ झाले तरच शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत होईल एकीकडे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक धोरणे राबविले जातात तर दुसरीकडे अतीशय उपयुक्त असणारे कालव्याचे प्रकल्प मात्र अर्धवट अवस्थेत अडकले जातात हा चिंतनाचा विषय बनला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे विद्यमान अर्थमंत्री आहेत त्यांनी यात लक्ष घातल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो.

Share This Article
error: Content is protected !!