बोगस पूरग्रस्तांच्या यादीतील अनियमितता व इतर प्रश्नासाठी २६ पासून आंदोलन सुरु
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड –इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन (आयएफटीयू ) चे राज्य सचिव कॉ. दिगंबर घायाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून आंदोलनाची दखल घेण्यात येत नसल्यामुळे २८ रोजी दुपारी एक वाजता शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर यांची भेट घेऊन निवेदनातील मागण्या संदर्भाने चर्चा करण्यात आली.
आंदोलनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.महाराष्ट्र जनसुरक्षा विद्येयक रद्द करा.
सांगवी येथील त्रिरत्न नगर मधील ड्रेनेज लाईन दुरुस्त करून सुरळीत करण्यात यावी. घन्टा गाडी दररोज आली पाहिजे.नाली उपसा सातत्याने झाला पाहिजे.
तसेच २०२४ मध्ये नांदेड शहरात झालेल्या अतिवृष्टीतील खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान वाटप करण्यात यावे.
शासन आदेश डावलून बनावट पूरग्रस्तांची यादी तयार करण्यात आली आहे ती यादी तात्काळ रद्द करावी व शासन आदेशात ज्यांची नावे नावे व जबाबदारी आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.२०२४ मधील पूरग्रस्तांना शासन आदेश डावलून यादी जिल्हा संकेत स्थळावर प्रसिद्धीस न देता ४१०५ लोकांना अनुदान वाटप केले आहे.ती प्रक्रिया चुकीची असल्यामुळे यादी तयार करणाऱ्या कडून ४ कोटी रुपये वसूल करण्यात यावेत.शहरातील वाढीव घर पट्टी व नळ पट्टी रद्द करा. तसेच सीटू व जमसंचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरसहा महिन्यापासून साखळी उपोषण सुरु आहे.
त्या उपोषणार्थीच्या मागण्या सोडवाव्यात.
आदी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून आंदोलनाचे नेतृत्व कॉ.दिगंबर घायाळे,कॉ.रावण सोनकांबळे,कॉ.रामजी भालेराव,कॉ.फुलन गायकवाड, कॉ.प्रल्हाद पवार,कॉ.बाबुदादा सिरगणवाड,कॉ.साहेबराव आळणे,कॉ.बाबू भंडारे,कॉ. प्रकाश सावळे,कॉ.मारोती हरबळे आदिजन करीत आहेत.
अशी माहिती कॉ.घायाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अशी माहिती कॉ.दिगंबर घायाळे राज्य सचिव :इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन (IFTU)यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे.