नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सर्व ॲग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 पर्यत या register.esharm.gov.in/#/iser/platform-worker-registration संकेतस्थळावर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग वर्कर,प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरवात केलेली आहे.
साधारणत: गिग व प्लॅटफॉर्म वर्कर शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार,लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार इ.मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार,फ्रोफेशनल सर्विस देणारे कामगार,हेल्थ केअर सेवा देणारे कामगार,ट्रॅव्हल्स व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडीया सर्विसेस इ. सर्व प्लॅटफार्म गिग वर्करच्या व्याखेत येतात.ॲमेझोन,फ्लीपकार्ट, मिंत्रा,स्नॅपडिल,अजिओ, मिशो,स्विगी,झोमॅटो अशा वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम esharm.gov.in वर नोंदीत होवू शकतील. केंद्र सरकारकडे डेटा तयार होईल म्हणून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.