प्रा.अनिल सूर्यवंशी सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव  प्रतिनिधी /आशोक वाघमारे

 नायगाव हायस्कूल नायगाव येथे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रा. श्री अनिल शेषेराव सूर्यवंशी यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी नायगाव चे जेष्ठ संचालक मा. श्री. केशवराव पा. चव्हाण, प्रमुख पाहुणे सुधाकर पा. चव्हाण व सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळराव पाटील सर , माधवराव पा शिंदे, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जि सूर्यवंशी सर, व सत्कारमूर्ती अनिल शेषेराव सूर्यवंशी व त्यांच्या सुविज्ञ् पत्नी राजश्री ताई, उप मुख्याध्यापक यशवंत चव्हाण, उपप्राचार्य प्रा. डॉ.गणेश देवडे,पर्यवेक्षक प्रा. म.हा. सोमावार,पर्यवेक्षक हनुमंत शिंदे पर्यवेक्षिका प्रा.शोभा शिंदे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते अनिल शेषराव सूर्यवंशी यांचा संपत्नीक सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. याप्रसंगी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी यांनी अनिल शेषराव सूर्यवंशी यांच्या कार्याचा गुणगौरव केला.

तसेच प्रा. पी. डी. जाधव बारूळकर,गोपाळराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार मूर्ती अनिल शेषराव सूर्यवंशी यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे आभार मानून सर्व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन वसंत माने सर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक प्रा. महादेव सोमवार यांनी मानले या कार्यक्रमाला शाळेतील

सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तिथ होते.

Share This Article
error: Content is protected !!