माहूर प्रतिनिधी पंडित धुप्पे
माहूर – वन परिक्षेत्र अधिकारी श्री आर एस जाधव माहूर यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी वन संरक्षक प्रा छत्रपती संभाजीनगर आणि उप वनसंरक्षक प्रा नांदेड यांच्याकडे दिनांक 22/06/2024 रोजी तक्रार दाखल केली आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी श्री आर एस जाधव यांनी माहिती अधिकार अर्जावर कार्यवाही न केल्याबाबत योगेश ठाकुर पवार यांनी दिनांक 22/ 06/2024 रोजी उप वनसंरक्षक ( मानव संसाधन व्यवस्थापन ) महाराष्ट्र राज्य नागपूर , वन संरक्षक प्रा छत्रपती संभाजीनगर,उप वनसंरक्षक प्रा नांदेड, जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या कडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने दिनांक 15/07/2024 रोजी वन संरक्षक प्रा छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकडून उप वनसंरक्षक प्रा नांदेड यांना तक्रारारा बाबत आपण कार्यवाही करण्यास सक्षम असल्यामुळे प्रकरणी नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अर्जदाराने मागणी केलेली माहिती परस्पर संबंधितास पाठवुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संबंधितास व या कार्यालयास सादर करावा परंतु आज 10 महीणे होऊनही त्यांनी कार्यवाहीच्या नावाखाली वेळकाढु धोरण अवलंबून माहिती न देणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकारी प्रा माहूर याला पाठीशी घातले आहेत ही कृती शासनाविरोधी व कर्तव्यात कसूर करणारी आहे म्हणून तक्रार अर्जावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रारद्वारे R T I तालुका प्रमुख योगेश ठाकुर पवार यांनी वन संरक्षक प्रा छत्रपती संभाजीनगर आणि उप वनसंरक्षक प्रा नांदेड यांच्याकडे तक्रार केली आहे वन परिक्षेत्र अधिकारी श्री आर एस जाधव यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.