उमरी विमा कंपन्याचा गलथान कारभार शेतकरी त्रस्त ; शासनाने दुर्लक्ष;

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी :-दरवर्षी शेतकर्‍यांच्या पिकांच्या मुळावर निसर्ग येतो,या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना पिकविमा मिळावा हा नियम असल्याने विमा कंपनी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देते,पण या नुकसान भरपाईचे दरवर्षी भिजत घोंगडे असते.विमा कंपन्यांचे आडमुठे धोरण, शासनाची कंपनीविषयीची मुळमुळीत भुमिका,शेतकरी प्रश्नाविषयी लोकप्रतिनिधींची ऊदासिन भुमिका यामुळे शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळवताना नाकी नऊ येतात.

   २०२४ च्या खरीप पिकांच्या पिकविम्याबाबतही असेच भिजत घोंगडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विधानसभेत पिकविमा कधी मिळणार याविषयी काही लोकप्रतिनीधींनी प्रश्न मांडल्यानंतर त्यांना ऊत्तर देताना कृषीमंञी माणिकराव कोकाटेंनी ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शेतकर्‍यांना पिकविमा मिळेल अशी मोठ्या जोशात घोषणा केली पण ही घोषणा पोकळ ठरण्याची चिन्ह दिसत असुन काल दिनांक २६ मार्चपर्यंत म्हणजे पाच दिवसांत राज्यातील फक्त २७ हजार शेतकर्‍यांना अग्रीम स्वरुप असलेली २५% पिकविमा रक्कम मिळालेली आहे.या शेतकर्‍यांचीही अजुन काढणी पश्चात तक्रारींची रक्कम पिकविमा कंपनीकडे बाकी आहे. त्यामुळे विम्याची पुर्ण रक्कम कृषीमंञी यांच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्च तर सोडा पण पुढील खरीप येईपर्यंतही शेतकर्‍यांच्या हाती पडणार की नाही याबाबत शोकांतिकाच आहे.

पिकविमा कंपनीची मुजोरी पुन्हा सरकारवर भारी?आजपर्यंच्या इतिहासात दरवर्षी पिकविमा कंपन्या शेतकर्‍यांना वेगवेगळ्या कारणांनी पैसे देण्यास टाळतात असे दिसतात‌.अनेक शेतकर्‍यांचा २०२० सालचा खरीप पिकविमा असाच पचवलेला आहे.याबाबत न्यायालयाने पिकविंमा कंपनीस सुनावुनही कंपनीने पिकविमा दिलेला नाही.गतवर्षीही तक्रारीत ञुटी काढत अनेक शेतकरी पिकविम्यापासुन वंचित ठेवले होते,यावेळीही थेट कृषीमंञ्यांनी विधानसभेत घोषणा करुनही शेतकर्‍यांना पैसे मिळत नसतील तर सरकारपेक्षाही कंपनी बलाढ्य आहे काय असा सवाल शेतकर्‍यांत व्यक्त होत आहे.

 

. सोयाबीन ,मुग, बाजरी, भुईमूग, मका हायब्रीड ज्वारी कांदा तिळ सहीत फक्त कापूस व तुर सोडता सर्व पिकांचे क्रॉप कॅलेंडर हे डीसेंबर मध्ये संपत असते. साधारण फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात कींवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापुस व तुर वगळता इतर सर्व पिकांची संपूर्ण पिकवीमा रक्कम शेतकऱ्यांना मिळायला हवी माञ वरील चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त सोयाबीन व नांदेड मध्ये थोडंफार काही पिकाचा पिकवीमा जमा झाला. जमा झालेला पिकवीमा सुध्दा अंतिम नाही व उर्वरित महाराष्ट्रात जमा होणारा पिकवीमा सुध्दा अंतिम नसणार आहे. थोडक्यात ही पध्दत 25%अग्रिम प्रमाणे चालू आहे. अंतिम टप्प्यातील म्हणजे काढणी व काढणी पश्चात नुकसान भरपाई सध्या कुठेही दिली जाणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे. तात्पर्य म्हणजे खरीप पिकवीमा ३१ मार्च पुर्वी राज्यातील लाभार्थी सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. पुढे हे भिजत घोंगडे कीती दिवस चालू राहील हे कंपनी व सरकारच जाणो.सर्व शेतकर्‍यांना घोषणे अगोदरच पिकविम्याची फक्त २५% रक्कम मिळालेली आहे.

Share This Article
error: Content is protected !!