काल पासून माहूर गडावर चैत्र नवरात्र उत्सवास प्रारंभ 

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

 माहूार ता.प्रतिनीधी/

माहूर – गडावरील श्री रेणुका देवीच्या मंदिरात प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष वेदपाठक, यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक जिल्हाधिकारी तथा सचिव झेनीथचंद्र दोनथुला, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव यांच्या उपस्थितीत विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, विनायक फांदाडे भवानीदास भोपी, दुर्गादास भोपी, यांच्या हस्ते चैत्र नवरात्र महोत्सवास रविवार दिनांक 30 मार्च 2025रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

              महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी सहा वाजता प्रसिद्ध सनई वादट पंडीत धुमाळ यांच्या सनई वादनाने रविवार ता. 30 मार्च2025 चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला.. 

सकाळी सहा वाजता मंदिराच्या प्रांगणात गुढी उभारून वेदमंत्रांच्या घोषात मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेस प्रारंभ करण्यातआला.सकाळी 9वाजता मुख्य गाभाऱ्यासह तुळजाभवानी, महालक्ष्मी,व परशुराम मंदीरात घटस्थापना केली जाणार आहे.  

त्यांनंतर शतचंडी संकल्प, चतृर्वेद पारायण / संकल्प, ध्वजपूजन, अलंकार पूजन, पुष्पपूजन सर्व पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 सकाळी नऊ वाजता श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभा-यातील घटस्थापना वेद घोषात संपन्न झाली सकाळी दहा वाजता मातेला पायस नैवेद्य व महाआरती, तसेच कुमारिका पूजन परिसर देवता पुजन व छबिना मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.

                            

दुपारी साडेबारा वाजता श्री रेणुका देवीस महानैवेद्य दाखवून मुख्य महाआरती नंतर दुपारी एक वाजता पंचांग पूजन- वाचन पूर्ण झाले तसेच भजन गायन होईल. सायंकाळी आठ ते साडेआठ वाजता वेदमंत्र पंचपदी , दीपमालवन झाले

द्वितीया, तृतीया,चतुर्थी नियमित महापूजा होईल तसेच शनिवारी ता2एप्रिल बुधवारी पंचमी निमित्ताने मातेची अलंकार महापूजा करण्यात येणार असून दिनांक 6 एप्रिल रविवारी दुर्गा सप्तशती पाठाच्या हवनाने चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता होईल.तसेच उत्सव काळात संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसाद, ठिकठिकाणी पीण्याचे शुध्द थंड पाणी, मंदिर परिसरात मंडप,पंखे इत्यादी व्यवस्था संस्थान तर्फे करण्यात आली तसेच उत्सव काळात प्रतिपदा ते पंचमी सकाळी 6ते10पंडीत नितिण धुमाळ यांचे सनई वादन,7ते 10अविराज थातेड यांचे भक्तिगीत,संजय जोशी गीत रामायण, पंचमीच्या दिवशी दुपारी 12ते2 श्रीमती देशपांडे भजनी मंडळ पुसद, सायंकाळी 6ते9 धनंजय जोशी भक्तिगीत, सहाव्या माळेला ह.भ.प. कृष्णा महाराज बाल कीर्तनकार शिर्डी, हे सकाळी मातेचरणी आपली सेवा अर्पण करणार आहेत सप्तमी, अष्टमीला नवचंडी हवन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली आहे.

 दिनांक.30मार्च ते 6 एप्रिल2025 पर्यंत संपन्न होणाऱ्या श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र उत्सवाचा भाविकांनी आनंद घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त समितीचे चंद्रकांत भोपी संजय कान्नव सर्व विश्वस्तसह पुजाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!