पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड : बिलोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले होते. या मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पुण्याहून नांदेडला आणले. या प्रकरणात रामतीर्थ पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे.

पीडित मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याबाबत आईने ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर सपोनि. संकेत दिघे यांनी मुलीच्या शोधासाठी पथक पाठविले. पोलिसांना ही मुलगी आणि तरुण पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पुणे गाठून दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

Share This Article
error: Content is protected !!