पालाईगुडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची सतरा वर्षा पासूनची परंपरा कायम!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

पाच विध्यार्थी नवोदय परीक्षेत प्रवेशास पात्र..

माहूर प्रतिनीधी/

 माहूरतालुक्यातील पालाईगुडा उच्च प्राथमिक येथील जिल्हा परिषद शाळेचे चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचविच्या विध्यार्थांसाठी घेतलेल्या नवोदय प्रवेश पात्र परीक्षेचा निकाल 25मार्च रोजी जाहीर झाला, त्यात शाळेतील अर्णेस्टो अमोल आडे, ओमकार संदीप पवार, योगीराज संदीपान वाघाडे, गौरी लुकेश जाधव, प्रज्ञा ज्ञानेश्वर करपते, हे विध्यार्थी प्रवेशास पात्र झाले असून शाळेने आपली सतरा वर्षाची परंपरा कायम राखली आहे,

    माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या शब्द गुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक वर्षात राबविले जातात, शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी स्वतः लक्ष घालून मेहनत घेतात, त्यामुळे शाळेचे नाव शैक्षणिक गुणवत्तेसह इतर उपक्रमातही नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात चर्चेला आलेले आहे, मागील अनेक वर्षापासून शाळेचे विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र परीक्षेत उत्तीर्ण होतात, यंदाच्या ही शैक्षणिक वर्षात हे पाच विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशास पात्र झाले आहे, विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व्ही, के, पिसलवार, शिक्षक एम. एस. गुड्डेवार. पी. टी. जाधव.कुडे सर.व्ही. एन. राठोड.चौधरी सर,कांबळे सर, लीना लंजे. मगर सर. आडे. सर. डाखोरे सर. मुनेश्वर सर. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिल पवार,भोरड येथिल सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी अमोल आडे, संतोष मेश्राम, राजूभाऊ, यांनी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले,

Share This Article
error: Content is protected !!