जि.प्रा.शाळा मुळझरा येथील मुख्याध्यापक श्री मारोती चिंतलवाड सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

 हिमायतनगर ता.प्रतिनिधी- बाबाराव जरगेवाड 

हिमायतनगर – किनवट तालुक्यातील मौजे मुळझरा येथील जि.प्रा.शाळा मुळझरा येथील मुख्याध्यापक श्री मारोती संभाजी चिंतलवाड सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न. दि 31/03/2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने संकुल भिशी अंतर्गत च्या शिक्षकांच्या वतीने दि.28/03/2025 रोजी 58 वर्ष सेवापुर्ती झाल्यामुळे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

चिंतलवाड सर यांचे शैक्षणिक कार्य पाहता त्यांनी जनगणना सर्वेक्षण, मतदान कार्य केंद्राध्यक्ष, मतदार नोंदणी बीएलओ, वृक्षारोपण संगोपन, गाव सर्वेक्षण असे विविध कार्य केले आहेत.असे म्हणतात शिक्षक हा सर्व गुण संपन्न असायला पाहिजे त्या म्हणीप्रमाणे मुळझरा येथील मुख्याध्यापक श्री मारोती संभाजी चिंतलवाड यांनी या उक्तीला सत्यात उतरवले आहे. चिंतलवाड सर यांना वाचन,लेखन,समाजकार्य करण्यात आवड होती.या दरम्यान त्यांनी चित्र काढणे, कविता करणे, योगा करणे अशा प्रकारचे विविध छंदही जोपासले. तीन अंकी नाटकातही त्यांनी खलनायकाची भूमिका केली. अनेक भजन स्पर्धेत सहभागी होते. तसेच काही सामाजिक विवाह मेळावे पण त्यांनी भरवले. त्यांच्या परिवारामध्ये तीन मुली, त्यामध्ये एक विवाहित मुलगी, एक मुलगा, आई वडील आहेत.

सौ. मंगल चिंतलवाड मॅडम (लाईफस्टाईल फिटनेस सेंटर नांदेड ) यांनी चिंतलवाड सर यांच्या कार्याविषयी गुणगौरव भाषण केले प्रियंका चिंतलवाड ह्या मुलींनी सुद्धा वडिलांविषयी मनोगत व्यक्त केले आहे .

या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव मेकाले सर (विस्तार अधिकारी इस्लापूर तसेच पंचायत समिती हिमायतनगर गटशिक्षण अधिकारी) होते. तसेच शंकर काटेवाड सर (केंद्रप्रमुख भिशी,) शिवाजी राठोड सर, मु.अ.भिसी, तसेच केंद्रांतर्गत असलेले सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे संचालक तथा दैनिक अर्थ चे संपादक व रिपब्लिक 24 न्युज चे मुख्य संपादक डि.एन.गुंडेकर सर, व लोकशाही पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा युवा पत्रकार संघटनेचे सचिव, तसेच चिंतलवाड सरांचे बंधू राम संभाजी चिंतलवाड तसेच गावातील पालकासह गावकरी मंडळी उपस्थित होती.

या वेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले सत्कारमूर्ती श्री मारोती संभाजी चिंतलवाड सर यांना पत्नीसह आहेर देण्यात आला. विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी श्री मारुती चिंतलवाड सर यांनी आपल्या 27 वर्षाच्या शैक्षणिक कार्यातील अनुभव व्यक्त केला. तसेच सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम नगर भोजनानंतर संपन्न झाला.

Share This Article
error: Content is protected !!