हुस्सा गावाला पुनर्वसन विकास प्रकल्प निधी जवळपास १५ ते १६ कोटी मंजूर.
नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे.
नायगााव – तालुक्यातील मौजे हुस्सा येथील गावातील अंतर्गत रस्ते व नाली साठी जवळपास १५ ते १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याच माध्यमातून गावातील रस्ते व नालीचे बांधकाम चालू करण्यात आले आहे.आणि सदर होत असलेले काम पूर्णतः दर्जाहीन कामे होत असल्याने गावातील नागरिकांत असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
हुस्सा हे गाव गोदावरी नदीकाठी असल्याने वारंवार पुराचा फटका बसत होता आणि पूर्ण गाव पाण्याखाली जात होतं यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात नदीच्या पुराचा सामना करावा लागत असल्याने शासनाने नदीकाठच्या गावांची दखल घेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु पुनर्वसित गावाच्या पायाभूत सुविधाचा अभाव असल्याने पुन्हा गावकऱ्यांच्या नशिबी संघर्ष होता यात विविध गोष्टीचा सामना करण्याची वेळ गावकर्यांना येत होती मात्र शासनाने सर्व बाबीचा विचार करून गावाच्या पायाभूत सुविधा मजबूत व दर्जेदार बनवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. मात्र संबंधित गुत्तेदार व इंजिनिअर यांच्याकडून निधींचा तीनतेरा करून व संबंधित इंजिनिअर व अधिकारी यांच्या मूकसमतीने गुत्तेदार यांना पाठिंबा देत काम मात्र दर्जाहीन होत आहे. याला अजून नेमका पाठिंबा कोणाचा? अशा प्रकारची चर्चा होताना दिसून येत आहे. हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीतून होत असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमतता असून सदर काम एकूण तीन ते चार गुत्तेदारांना मिळाले आहे. आणि तीन ते चार गुत्तेदारांनी कामात मनमानी कारभार करून शासनाने नेमून दिलेल्या अंदाज पत्रकार नुसार काम करण्याऐवजी कामात निकृष्ट दर्जाचे करत असून यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची बाब गावकऱ्यापुढे दिसून येत आहे. कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येत आहे. अर्थात माती मिश्रित मुरूम, लोखंडी रोड, सिमेंट, सिलकोट, वापरण्यात येत असलेली वाळू हे माती मिश्रित असून आणि नालीची व रस्त्यांची योग्य मोजमाप न करता मनमानी जागेत काम करत आहेत. यात पाण्याचा अल्प प्रमाणात वापर असल्याने काम मात्र निकृष्ट दर्जाची होताना दिसून येत आहे.
सदर होत असलेल्या कामात रस्त्यांची लांबी, रुंदी, व थिकनेस मोजमाप न करता मनमानी कारभार संबंधित इंजिनिअर व गुत्तेदार यांच्याकडून होताना दिसून येत आहे. तर नाली बांधकामात रुंदी, लांबी, उंची यांचा काही मोजमाप न करता कमी जाडीचा लोखंडी रॉड वापरून नालीची लाइनिंग देखील व्यवस्थित काढण्यात आली नाही . सदर काम झपाट्याने होत असून नेमकं घाई कशाची? कामाची सारव सराव करून बिलं काढण्याची तळमळ म्हणायची का? रस्ते व नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व माती मिश्रित मुरमाचा वापर असून होत असलेला रस्ता व नाली किती काळ टिकेल यांचा काही अंदाज नाही अशा प्रकारची चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी गावकऱ्यांची मागणी. हुस्सा गावात गेल्या अनेक वर्षापासून एवढा मोठा निधी मिळाला नव्हता गाव पुनर्वस्थित असल्याने गावाच्या पायाभूत सुविधा मजबूत नसल्याने गावातील नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे गावात व्यवस्थित नाली रस्ते नसल्याने गावातील वयोवृद्ध,लहान बालक,व नागरिक, शेतकरी यासह संपूर्ण गावकऱ्यांना मोठा त्रास होता. गावाला निधी कोट्यावधीचा काम मात्र मजबूत होईना निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व या सर्व कामाकडे नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का आणि संबंधितावर गुन्हे दाखल करतील का अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त होत आहे व संबंधित इंजिनिअर अधिकारी गुत्तेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे.