ईकळी माळ येथे प्रकाशन होणार….!
नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे
नायगाव – ईकळीमाळ येथील लेखिका श्रीमती सुलोचना गोविंदराव पुयड लिखित दीर्घकाव्य माझी ईकळी शिर्डी झाली या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्तावर ईकळी माळ येथे होणार आहे.
गोदावरी काठी वसलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील ईकळी माळ नावाचे एक छोटेसे गाव असून तेथे पर्वत साई नावाची एक सिद्ध योगी विभूती होऊन गेली. त्यांनी या गावात शंभू महादेवाची स्थापना केली. मन शांतीसाठी तहानलेल्या साधकांना त्यांनी अनुग्रह दिला. मन शांती तर दिलीच शिवाय आध्यात्मिक राजमार्गावर आणून सोडले. विज्ञान युगातील या राष्ट्रसंताचे रसाळ चरित्र ईकळी माळ येथील लेखिका श्रीमती सुलोचना गोविंदराव पुयड यांनी कवितेतून सांगितले आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला भौतिक सुखं प्राप्त होऊ लागली. पण माणसाच्या मनात ठाण मांडून बसलेली एकाकीपणाची भावना वृद्धिंगत होऊ लागली. या गर्तेतून बाहेर येण्यासाठी लेखिका सुलोचना पूयड यांचे पर्वतसाई स्तवन हे अत्यंत उपयुक्त असे स्तोत्र झाले आहे. साधकांसाठी हे स्तोत्र कैवल्यदायी ठरणार आहे. लय, नाद आणि माधुर्याने परिपूर्ण झालेले हे स्तोत्र साधकांसाठी पर्वणीच ठरले आहे. उमरी येथील सद्गुरु सदानंद बाबा महाराज समाधी मंदिराचे संस्थानाधिपती श्री अरविंद महाराज यांचा या पुस्तकाला आशीर्वाद लाभला असून राजेश गंगाधरराव कुंटूरकर यांची प्रेरणा मिळाली आहे.
”माझी ईकळी शिर्डी झाली” या पुस्तकासाठी संपादन सहाय्य प्रतिभावंत कवी, लेखक, समीक्षक तथा सहशिक्षक डॉ. बाळू दुगडूमवार कुंटूर, नायगाव आरोग्य विभागातील तालुका समूह संघटक अनुप उत्तमराव जगताप यांच्यासह विशेष सहकार्य उमरी येथील जेष्ठ पत्रकार नरेंद्र येरावार, नांदेड प्राईम कॅम्पुटरचे प्रशांत गुर्जर, उमरी कृष्णा प्रिंटर्सचे प्रसाद येरावार, शंकर महाराज गिरी, एस. आर. पुजरवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईकळी माळचे सर्व शिक्षक बंधूं, दयाल महाराज गिरी, बालाजी पुयड, विठ्ठल पुयड, गिरीधर हाणेगावे, बालाजी शिळे, गोविंद सोनटक्के, कैलास पाटील जाधव, संतोष पाटील जाधव, परमेश्वर जाधव, आकाश पाटील कल्याण, मारोती पुयड, प्रशांत पुयड, माधव पुयड, काशिनाथ पुयड आदीचे लाभले आहे.तर या पुस्तकाला प्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांची प्रस्तावना आहे.