दर्शनासाठी रांगा फाल्गुन अमावस्या खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त कैलास टेकडीवर भाविकांची प्रचंड गर्दी
रस्ता व पाण्याची सुविधा नसल्याने भाविकांचे प्रचंड हाल
अनेक समाजसेवकाकडून अन्नदान आणि पाण्याचे मोफत वाटप
श्री दत्त शिखर संस्थान समिती वनविभाग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
जिल्हाधिकारी साहेब माहूर कडे लक्ष द्या
श्रीक्षेत्र माहूर. इलियास बावाणी
माहूर – श्रीक्षेत्र माहूर गडावरील कोरी भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अति प्राचीन आणि पवित्र भगवान शिवशंकराचे तपस्याचे तसेच जागृत ठिकाण पवित्र कैलास टेकडीवर फाल्गुन अमावस्या आणि खंडग्रास सूर्यग्रहणा निमित्त हजारोच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी बम बम भोले च्या गजरात उपस्थिती लावली परंतु कैलास पर्वतावर जाणारा रस्ता वन विभागासह प्रशासनाने लक्ष न दिल्याने जीव घेणा ठरत असून अनेक भाविकांना पायी चालताना अनेक प्रकारच्या दुखापती झाल्याने भाविकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती सोबतच येथे श्री दत्त शिखर संस्थान विश्वस्त समितीकडून कुठलीही व्यवस्था केली नसल्याने समाजसेवक भाविकांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत अन्नदान आणि पाण्याचे वाटप केल्याने ठेचकाळात चालण्याचा त्रास सहन करत भाविकांनी आनंदात दर्शन घेतले
श्री दत्त शिखर संस्थान श्री अनुसया माता संस्थान वर निश्चित भक्त असलेले कंत्राटदार माधवराव एकलारे यांनी प्रचंड त्रास सहन करत अतिशय उत्कृष्ट रस्ता बनविला परंतु श्रीदत्त शिखर पायथ्यापासून ते कैलास टेकडीकडे जाणारा रस्ता वन विभागाचे अधिकार क्षेत्रात येत असल्याने वनविभागाने हजारो वेळा मागणी होऊनही कुठलाही प्रस्ताव पाठविलेला नसल्याने आजपर्यंत या रस्त्यावर साधे मुरूम सुद्धा टाकण्यात आलेले नाही अनेक भाविकांनी स्वखर्चातून रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता चालण्यालायक बनविला परंतु अनेक ठिकाणी रस्त्यावर बारीक दगडच असल्याने त्या ठिकाणची दुरुस्ती करता येत नाही त्यामुळे भाविकांना जंगलातून पाय वाटा बनवत त्रास सहन करत दर्शन घ्यावे लागते या ठिकाणी भगवान शिव शंकरांनी घोर तपस्या केल्याची माहिती असून त्या ठिकाणाला कोरी भूमी असेही म्हणतात या ठिकाणी दर पौर्णिमेला हजारोच्या संख्येने भावीक येतात महा कुंभ मेळा समाप्ती तसेच महाशिवरात्रीच्या दीवशी 24 तासात लाखावर भाविकांनी येथे दर्शन घेतले होते तसेच महत्त्वाची बाब म्हणून अनेक वयोवृद्ध भाविक येथे तपस्या आणि ध्यानधारणा करण्यासाठी येतात त्यांना टीन शेडच्या निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था नसल्याने लाखो भाविकांचा हिरमोड होत आहे
नांदेड जिल्ह्याला अनेक मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी वन विभागाचे अधिकारी लाभले तसेच श्री दत्त शिखर संस्थानच्या विश्वस्त समितीतील एकाही सदस्यांनी भेट दिली नसल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने त्यांनी पवित्र इंजाळा तलाव आणि कैलास टेकडी या ठिकाणी भेट देऊन ईजाळा तलावातील काळ कैलास टेकडीवर जाणारा रस्ता तात्काळ बनवावा अशी मागणी भाविकातून केली जात होती