एकेरी रस्त्याने वाहनधारकासह शेतकऱ्यांना त्रास
माहूर तालुका प्रतिनिधी/इलियास बावाणी
माहूर- तालुक्यातील मालवाडा घाटाला लागून असलेल्या माहूर वळण रस्त्यावरून लांजी बायपास ते वडसा पडसा टाकळी नागोबा मंदिर कडे जाणारा रस्त्यासह सायफळ मदनापुर सह वाईबाजार सिनखेड पर्यंत जाणारा रस्ता एकेरी बनविला गेल्याने तसेच उंच सखल रस्ता आणि बुटक्या फुलांमुळे रस्त्यावरील वाहतूक प्रभावित होत असून शेतकऱ्यांच्या उसाने भरलेल्या ट्रॉल्या ट्रक चढउतारामुळे पलटी होऊन रस्ता बंद पडत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करून बुटके फुल मोठे व उंच करावे अशी मागणी शेतकऱ्यांसह वाहनधारकातून होत आहे
माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग वगळता एक रस्ता श्री दत्तशिखर मार्ग वानोळा राजगड किनवट जातो आणि दुसरा रस्ता लांजी बायपास मदनापूर सिंदखेड सह दहेली वरून राष्ट्रीय महामार्ग आदिलाबादला जोडल्या जातो या रस्त्यावर जवळपास 100 पेक्षा जास्त खेडी असून सदरील रस्ता एकेरी असल्याने तसेच यावर अनेक बुटके पूल असल्याने पावसाळ्यात हा रस्ता बंद पडून अनेक खेड्यांचा संपर्क तुटतो तसेच एखादे वाहन रस्त्यावर पलटी झाल्यास पूर्ण रस्ता जाम होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला वेळेत बाजारपेठेत पोहोचणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते तर वाहनधारकांना दुसऱ्या रस्त्या वरून जावे लागत असल्याने वेळ आणि मनस्ताप सहन करावा लागतो
तसेच माहूर श्री दत्त शिखर मार्ग वानोळा कुपटी राजगड किनवट असा जाणारा मार्गही अनेक ठिकाणी एकेरी असल्याने या रस्त्याचे ही दुपद्रिकरण करून बुटक्या फुलांची उंची वाढवत सदरील रस्ता रुंद करावा अशी मागणी होत असून पावसाळ्याआधी लांजी बायपास वडसा पडसा मदनापूर सिंदखेड कडे जाणाऱ्या मार्गाचे तात्काळ रुंदीकरण करावे अशी मागणी होत आहे