कहाळा (बु) येथे अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन….!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 नायगाव  प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नायगाव – तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील हनूमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व किर्तन महोत्सवाला दिनांक 3 एप्रिल पासून सुरुवात होणार असून दिनांक 10 एप्रिल रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

गुरुवर्य हभप निळकंठ महाराज कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि कीर्तन महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

या कीर्तन महोत्सवात दिनांक 3 एप्रिल रोज गुरुवार ह भ प निळकंठ महाराज कहाळेकर, दिनांक 4 एप्रिल रोज शुक्रवार ह भ प विश्वनाथ महाराज काकांडीकर, दिनांक पाच एप्रिल रोज शनिवार ह भ प चंद्रकांत महाराज लाठकर, दिनांक सहा एप्रिल रोज रविवार ह भ प पांडुरंग महाराज पांगरीकर, दिनांक 7 एप्रिल रोज सोमवार ह भ प वासुदेव महाराज कोलंबीकर, दिनांक 8 एप्रिल रोज मंगळवार ह भ प श्री राजेश महाराज पाटील गुंजर्गेकर, दिनांक 9 एप्रिल रोज बुधवार ह भ प कृष्णा महाराज राजूरकर आणि दिनांक 10 एप्रिल रोज गुरुवारी ह भ प दीपक महाराज मेठे केजकर यांचे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत काल्याचे किर्तन होणार आहे. दरम्यान काकडा आरती. काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी दोन ते पाच भागवताचार्य ह भ प श्री पांडुरंग महाराज पांगरीकर यांची श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी पाच वाजता हरिपाठ आणि दररोज रात्री साडेआठ वाजता हरी किर्तन व हरी जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कहाळा बुद्रुक येथील समस्त गावकरी मंडळींनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!